Ukraine Crisis : भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना युक्रेन सोडण्याचा सल्ला, दूतावासाकडून सूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 12:59 PM2022-02-15T12:59:41+5:302022-02-15T13:00:29+5:30

Ukraine Crisis : मंगळवारी दूतावासाने यासंदर्भात एक सूचना जारी केली. यामध्ये भारतीय नागरिकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना युक्रेनमधून तात्पुरते निघून जाण्यास सांगण्यात आले आहे.

Ukraine Crisis: embassy of india in kyiv asks indians to leave ukraine temporarily | Ukraine Crisis : भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना युक्रेन सोडण्याचा सल्ला, दूतावासाकडून सूचना जारी

Ukraine Crisis : भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना युक्रेन सोडण्याचा सल्ला, दूतावासाकडून सूचना जारी

Next

नवी दिल्ली : कीवमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना युक्रेन (Ukraine) सोडण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवारी दूतावासाने यासंदर्भात एक सूचना जारी केली. यामध्ये भारतीय नागरिकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना युक्रेनमधून तात्पुरते निघून जाण्यास सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे याआधीही अमेरिकेसह अनेक देशांनी आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना युक्रेन सोडण्यास सांगितले आहे.

भारतीय दूतावासाने जारी केलेल्या सूचनेत म्हटले आहे की, "युक्रेनमधील सध्याच्या परिस्थितीची अनिश्चितता लक्षात घेता, युक्रेनमध्ये राहणारे भारतीय नागरिक, विशेषत: ज्या विद्यार्थ्यांना राहण्याची गरज नाही, ते तात्पुरते युक्रेनमधून बाहेर जाण्याचा विचार करू शकतात. भारतीय नागरिकांना युक्रेन आणि युक्रेनमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे." याचबरोबर, पुढे म्हटले आहे की, "भारतीय नागरिकांना विनंती आहे की त्यांनी युक्रेनमधील त्यांच्या उपस्थितीबद्दल दूतावासाला कळवावे, जेणेकरून गरज पडल्यास त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल. युक्रेनमधील भारतीयांना सेवा देण्यासाठी सामान्यपणे काम करेल."

ऑस्ट्रेलियानेही राजनैतिक अधिकाऱ्यांना दिले आदेश
मॉस्को आणि कीवमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे ऑस्ट्रेलियानेही युक्रेनमधील आपले दूतावास कार्यालय रिकामे करण्यास सुरूवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मारिस पेन यांनी रविवारी घोषणा केली की, कीवमधील संपूर्ण कर्मचार्‍यांना युक्रेन सोडण्यास सांगण्यात आले आहे. दूतावासातील काम थांबले आहे आणि ते पश्चिम युक्रेनमधील सेव्हच्या तात्पुरत्या कार्यालयात पाठवण्यात आले आहे. यासोबतच ऑस्ट्रेलियातील नागरिकांना तातडीने युक्रेन सोडण्याचा सल्लाही मारिस पेन यांनी दिला आहे.

16 फेब्रुवारी रोजी होणार युक्रेनवर हल्ला
रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या वादामुळे युक्रेनमध्ये राहणाऱ्या लोकांची चिंता वाढली आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेवर आपले 1 लाखाहून अधिक सैनिक तैनात केले असून ते कधीही युक्रेनवर हल्ला करू शकतात, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची एक फेसबुक पोस्टही समोर आली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, 16 फेब्रुवारी हा युक्रेनवरील हल्ल्याचा दिवस असेल. मात्र युक्रेन या दिवशी एकता दिवस साजरा करणार आहे. यासंबंधीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

युक्रेन आणि रशियामधील वाद काय आहे?
युक्रेन आणि रशियामधील संपूर्ण वाद नाटोमध्ये सामील होण्याबाबत आहे. युक्रेन नाटोचा भाग होण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. नाटो अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि फ्रान्स सारख्या 30 देशांचा समावेश असलेला एक लष्करी गट आहे आणि रशियाचे अनेक शेजारी देश त्याचा भाग आहेत. रशियाची बाजू अशी आहे की जर युक्रेनही नाटोचा भाग बनला तर त्याला चारही बाजूंनी शत्रूंनी घेरले जाईल आणि अमेरिकेसारखे देश त्यावर वर्चस्व गाजवेल. तसेच, भविष्यात जर रशियाने युक्रेनवर हल्ला केला तर तो नाटोमध्ये सामील झाला तरी 30 देश रशियाचे शत्रू होतील आणि युक्रेनला लष्करी मदत करण्यात पुढे असतील.

Web Title: Ukraine Crisis: embassy of india in kyiv asks indians to leave ukraine temporarily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.