युक्रेनचे विमान कोसळून १७६ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 06:27 AM2020-01-09T06:27:49+5:302020-01-09T06:27:57+5:30

युक्रेनच्या विमान कंपनीचे बोइंग- ७३७ विमान बुधवारी उड्डाणानंतर लगेचच कोसळून १६७ प्रवासी व नऊ विमान कर्मचारी, असे सर्व १७६ जण ठार झाले, असे इराणच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Ukraine plane crash kills 3 | युक्रेनचे विमान कोसळून १७६ जण ठार

युक्रेनचे विमान कोसळून १७६ जण ठार

Next

तेहरान : युक्रेनच्या विमान कंपनीचे बोइंग- ७३७ विमान बुधवारी उड्डाणानंतर लगेचच कोसळून १६७ प्रवासी व नऊ विमान कर्मचारी, असे सर्व १७६ जण ठार झाले, असे इराणच्या अधिकाऱ्याने सांगितले. हे विमान येथील खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून युक्रेनची राजधानी किव्हला जाण्यासाठी सकाळी ६.१० मिनिटांनी निघाले. विमानतळाच्या वायव्य दिशेला ४५ किलोमीटरवर शहरीयार परगण्यातील खलाज अबाद येथे ते शेतात कोसळले. उड्डाणानंतर काही मिनिटांतच ते रडारवरून अदृश्य झाले होते.
किव्ह : अपघातग्रस्त विमान २०१६ मध्ये बांधणी झालेले होते व ६ जानेवारी रोजीच त्याची तपासणी केली होती, असे बोइंग कंपनीने सांगितले. विमान कर्मचाºयाचा अनुभव विचारात घेतला, तर त्याच्याकडून चूक होण्याची शक्यता फारच कमी आहे, असे युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सचे उपाध्यक्ष इगोर सोस्नोव्हस्की यांनी सांगितले. मृतांत ८२ इराणी, ६३ कॅनडाचे, ११ युके्रन, १० स्वीडन, चार अफगाणिस्तानचे, जर्मन व ब्रिटनचे प्रत्येकी तीन नागरिक होते, असे युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्याने टिष्ट्वटरद्वारे सांगितले. या विमानाला झालेल्या अपघाताबद्दल निराधार गोष्टी बोलणाऱ्यांना युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी इशारा दिला.
मृतांत ७० पुरुष, ८१ महिला व १५ मुले होती, असे युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडायमायर झेलेन्स्की यांनी सांगितले. या विमानाचे ब्लॅक बॉक्सेस इराणच्या शोध आणि बचाव पथकांना सापडले.

Web Title: Ukraine plane crash kills 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.