युक्रेनची सूत्रे उद्योगपतीच्या हाती

By admin | Published: May 27, 2014 05:59 AM2014-05-27T05:59:03+5:302014-05-27T05:59:03+5:30

युक्रेनमधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अब्जाधीश चॉकलेट उद्योजक पेट्रो पोरोशेंको विजयी झाले

Ukraine's formula is in the hands of the industrialist | युक्रेनची सूत्रे उद्योगपतीच्या हाती

युक्रेनची सूत्रे उद्योगपतीच्या हाती

Next

कीव : युक्रेनमधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अब्जाधीश चॉकलेट उद्योजक पेट्रो पोरोशेंको विजयी झाले असून, युक्रेनच्या पूर्व भागातील रशियन बंडखोरांना हुसकावून लावणे व या अस्थिर देशाला पुन्हा प्रगतीच्या मार्गावर नेण्याचे आव्हान त्यानी स्वीकारले आहे. युक्रेनच्या राजकीय वर्गात प्रभावी असणार्‍या या उद्योजकाने युक्रेनमधील क्रांतीला, तसेच रशियासमर्थक अध्यक्षाला पदच्युत करण्यासाठी आपले वजन व पैसा खर्च केला होता. पोरोशेंको यांना मतदानोत्तर निकालाच्या पहिल्या फेरीत ५५ टक्के मते मिळाली आहेत, तर प्रतिस्पर्धी युलीया टॉमशेंको यांना १३ टक्के मते मिळाली आहेत. त्यांचा पराभव होणार हे उघड आहे. युक्रेनच्या नागरिकांनी आपली मते पोरोशेंको यांच्या पारड्यात टाकली आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी क्रिमिया प्रांत युक्रेनपासून तोडल्यापासून युक्रेनमध्ये राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. ती नव्या अध्यक्षांच्या निवडीने भरून येईल असे मानले जात आहे. रशियन बंडखोरांनी बंद केला डोनस्टेक विमानतळ डोनस्टेक- सशस्त्र रशियन बंडखोरांनी युक्रेनच्या पूर्वभागातील डोनस्टेक येथील विमानतळ जबरदस्तीने बंद केला आहे. युक्रेनमध्ये अध्यक्षपदासाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत बंडखोरांनी या भागातील ८० टक्के मतदान केंद्रे बंद केली होती. त्यामुळे मतदारांना मतदान करता आले नव्हते. या भागातील डोनस्टेक व ल्युहान्स्क या दोन शहरात बंडखोरांनी पीपल्स रिपब्लिक जाहीर केले होते. ही शहरे आता युक्रेनची नाहीत असा बंडखोरांचा दावा आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Ukraine's formula is in the hands of the industrialist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.