युक्रेनची सत्ता जाणार विनोदी नटाच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 03:39 AM2019-04-22T03:39:24+5:302019-04-22T03:39:33+5:30
रविवारी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसऱ्या फेरीच्या मतदानानंतर झेलेन्स्की ७३ टक्के मते मिळवून विजयी होत असल्याचा अंदाज ‘एक्झिट पोल’मध्ये व्यक्त केला गेला.
कीव्ह : युरोपीय संघ आणि रशिया यांच्यातील ‘बफर’ मानल्या जाणाऱ्या युक्रेन या ४५ लाख लोकसंख्येच्या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या देशाची सत्ता व्लोदोमिर झेलेन्स्की या विनोदी नटाच्या हाती जाणार हे अता स्पष्ट झाले आहे. रविवारी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसºया फेरीच्या मतदानानंतर झेलेन्स्की ७३ टक्के मते मिळवून विजयी होत असल्याचा अंदाज ‘एक्झिट पोल’मध्ये व्यक्त केला गेला.
विद्यमान राष्ट्राध्यक्ष पेत्र पोरोशेन्को यांच्या राजवटीविरुद्ध भ्रष्टाचार. गरीबी आणि फुटीरवाद्यांचे वाढते प्राबल्य यावरून खदकदणाºया संतापाचे भांडवल करणे हे झेलेन्स्की यांच्या यशाचे इंगित आहे. रुपेरी पडद्यावर भूमिका बजावणाºया झेलेन्स्कीना राजकारणात यशस्वी होण्यासाठी बरंच काही पणाला लावावे लागेल. २०१४ मध्ये पोरोशेन्को रशियासमर्थक सरकार उलथून टाकून सत्तेवर आले होते व त्याच रागातून रशियाने युक्रेनचा क्रीमिया प्रांत बळकावला होता. त्यावेळच्या ‘गुलाबी क्रांती’चे स्वप्न त्यांनी पुरे केले नाही, याचा मतदारांना राग आहे. (वृत्तसंस्था)
राष्ट्राध्यक्षांची केली होती भूमिका
झेलेन्स्की हे युक्रेनमधील लोकप्रिय टीव्ही अभिनेते आहेत व एका मालिकेत त्यांनी वठविलेली राष्ट्राध्यक्षांची भूमिका खूप गाजली होती. नववर्षदिनी झेलेन्स्की यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा जाहीर केले तेव्हा अनेकांनी तो निव्वळ विनोद मानून थट्टा केली होती. आता तेच झेलेन्स्की पुढील पाच वर्षे खºयाखुºया राष्ट्राध्यक्षाची भूमिका पार पाडणार आहेत.