युक्रेनचे पंतप्रधान अर्सेनिय पायउतार
By admin | Published: April 11, 2016 02:28 AM2016-04-11T02:28:36+5:302016-04-11T02:28:36+5:30
महिनाभरानंतरही राजकीय पेचप्रसंग कायम राहिल्यामुळे युक्रेनचे पंतप्रधान अर्सेनिय याटसिनयुक यांनी रविवारी राजीनामा दिला. राजकीय पेचप्रसंगामुळे सरकार जणू पांगळे बनले होते
Next
किव्ह : महिनाभरानंतरही राजकीय पेचप्रसंग कायम राहिल्यामुळे युक्रेनचे पंतप्रधान अर्सेनिय याटसिनयुक यांनी रविवारी राजीनामा दिला. राजकीय पेचप्रसंगामुळे सरकार जणू पांगळे बनले होते व महत्त्वाच्या पाश्चिमात्य मदतीही ठप्प झाल्या होत्या. मी स्थैर्यासाठी प्रत्येक गोष्ट केली आणि सत्तेचे हस्तांतर सरळरीत्या व्हावे म्हणून मी पायउतार व्हायचे ठरविले होते, असे पाश्चिमात्य देशांच्या बाजूने असलेले अर्सेनिय यांनी आपल्या व्हिडिओवर केलेल्या भाषणात सांगितले. दोनच महिन्यांपूर्वी त्यांच्या सरकारवर आलेल्या अविश्वास ठरावातून ते बचावले होते.