इराणसोबतच्या आण्विक वाटाघाटींना अखेर यश

By admin | Published: April 3, 2015 11:25 PM2015-04-03T23:25:13+5:302015-04-03T23:25:13+5:30

: गेले काही दिवस चाललेल्या चर्चेनंतर इराण व जागतिक महासत्ता यांच्यात आण्विक करारावर एकमत झाले असून, या करारामुळे इराणच्या आण्विक कार्यक्रमावर

Ultimately, success in nuclear negotiations with Iran | इराणसोबतच्या आण्विक वाटाघाटींना अखेर यश

इराणसोबतच्या आण्विक वाटाघाटींना अखेर यश

Next

जिनिव्हा : गेले काही दिवस चाललेल्या चर्चेनंतर इराण व जागतिक महासत्ता यांच्यात आण्विक करारावर एकमत झाले असून, या करारामुळे इराणच्या आण्विक कार्यक्रमावर एकीकडे नियंत्रण येणार आहे, तर दुसरीकडे इराण प्रजासत्ताकावरील आर्थिक निर्बंध शिथिल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आम्ही निर्णायक पाऊल उचलले आहे. संयुक्त सामंजस्य कृती आराखड्यावर तोडगा काढण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, असे युरोपियन युनियनच्या परराष्ट्र प्रतिनिधी फ्रेडरिका मोघेरिनी यांनी सांगितले. इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरीफ यांच्याबरोबर लुसाने येथे घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय असून, इराणच्या अणुसमृद्धीकरण कार्यक्रमावर यामुळे मर्यादा येईल.
या मोबदल्यात इराणी जनतेला सर्वाधिक काळजी असणारे आर्थिक निर्बंध उठविले जाणार असून मुत्सद्देगिरीचा हा विजय मानण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने, तसेच अमेरिकेने घातलेले आर्थिक निर्बंध अत्यंत जाचक होते. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Ultimately, success in nuclear negotiations with Iran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.