२५ वर्षीय शिक्षिकेने १४ वर्षीय विद्यार्थ्याला फसवलं, कारमध्ये अनेकदा ठेवले त्याच्यासोबत शरीरसंबंध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 01:52 PM2021-10-27T13:52:41+5:302021-10-27T13:52:52+5:30
२५ वर्षीय शिक्षिकेने तिच्या एका १४ वर्षीय विद्यार्थ्याला आपल्या जाळ्यात अडकवलं आणि त्याच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले.
गुरू-शिष्याच्या नात्याला सर्वात पवित्र नातं मानलं जातं. पण अमेरिकेतील एका शिक्षिकेने या नात्याला काळिमा फासण्याचं काम केलंय. ब्रिटनच्या Horsham, West Sussex ची राहणारी २५ वर्षीय शिक्षिकेने तिच्या एका १४ वर्षीय विद्यार्थ्याला आपल्या जाळ्यात अडकवलं आणि त्याच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. आता या शिक्षिकेला तुरूंगाची हवा खावी लागणार आहे.
करत होती ब्लॅकमेल
आरोपी शिक्षिकेचा हा कारनामा जेव्हा समोर आला तेव्हा तिच्या विरोधात अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तिने चौकशीत मान्य केलं की, तिने अल्पवयीन मुलाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि कारमध्ये अनेकदा त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं की, आरोपी शिक्षिका विद्यार्थ्याला ब्लॅकमेलही करत होती. 'डेली स्टार'मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ही संपूर्ण घटना ब्रिटनच्या Horsham, West Sussex मधील एका शाळेतील आहे. इथे २५ वर्षीय शिक्षिका फतिना हुसैन काम करत होती.
असा झाला भांडाफोड
ही शिक्षिका तेव्हा चर्चेत आली जेव्हा तिने गमती-गमतीत एक दिवस आपल्या मैत्रिणींना आपला कारनामा सांगितला. तिने सांगितलं की, ती तिच्या क्लासमधील १४ वर्षीय मुलासोबत शारीरिक संबंध ठेवते. जेव्हा हे प्रकरण पोलिसात पोहोचले तेव्हा २५ वर्षीय फतिना हुसैनने मुलाच्या परिवाराला धमक्या देणं सुरू केलं. त्यासोबत त्यांना पैसे देण्याचा प्रयत्नही केला.
या प्रकरणाची सुनावणी ब्राइटन क्राउन कोर्टात सुरू होती. कोर्टाने हुसैनला मुलाच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात ५ वर्ष आणि चार महिन्याची शिक्षा सुनावली. याआधी या शिक्षिकेने दावा केला होता की, तो १४ वर्षाच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवल्यावर गर्भवती झाली होती. गेल्या जूनमध्ये जामिनावर सुटल्यावर हुसैनने पोलिसांची चौकशी थांबवण्यासाठी मुलगा आणि त्याच्या परिवाराला त्रास देणं सुरू केलं होतं.
आणखी मुलांना फसवण्याचा प्रयत्न
शिक्षिका इतक्यावरच थांबली नाही फेक सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून हुसैनने आणखी काही मुलांची छेड काढण्याचा प्रयत्न केला. मुलाच्या परिवारावर केस मागे घेण्यासाठी दबाव टाकत हुसैन त्याच्या परिवारातील एका सदस्याला नोकरीहून काढण्याची धमकी दिली होती.