CoronaVirus: संयुक्त राष्ट्रसंघाकडून भारताची प्रशंसा; मदतीचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 02:45 AM2020-04-19T02:45:42+5:302020-04-19T06:56:35+5:30

अमेरिकेसह ५५ देशांना औषधपुरवठा

UN chief Antonio Guterres salutes India for helping others in fight against Covid 19 | CoronaVirus: संयुक्त राष्ट्रसंघाकडून भारताची प्रशंसा; मदतीचे कौतुक

CoronaVirus: संयुक्त राष्ट्रसंघाकडून भारताची प्रशंसा; मदतीचे कौतुक

Next

संयुक्त राष्ट्रे : कोरोनाच्या मुकाबल्यासाठी इतर देशांना मदत करत असल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी भारताचे कौतुक केले आहे. हायड्रॉक्झिक्लोरोक्वीन हे औषध भारताने अमेरिकेसह काही देशांना पाठविल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी गुटेरस यांनी हे गौरवोद्गार काढले आहेत.

मलेरियावर वापरले जाणारे हायड्रॉक्झिक्लोरोक्वीन हे औषध कोरोनावरील उपचारांसाठीही उपयुक्त असल्याचे अमेरिकेच्या अन्न व औषध विभागाने म्हटले होते. या औषधाचा प्रयोग न्यूयॉर्कमधील १५०० रुग्णांवरही करण्यात आला होता.

हायड्रॉक्झिक्लोरोक्वीनवरील निर्यातबंदी भारताने काही दिवसांपूर्वी मागे घेतल्यानंतर या औषधाच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर गुटेरस म्हणाले की, कोरोना विषाणूविरोधात जगभरातील लढ्यामध्ये मदत करण्याची क्षमता असलेल्या प्रत्येक देशाने दुसºया देशाला सहकार्य केले पाहिजे.

देशात औषधांचा पुरेसा साठा आहे याची नीट खात्री केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हायड्रॉक्झिक्लोरोक्वीनसह १४ औषधांच्या निर्यातीवरील बंदी
उठविली होती. त्यानंतर हायड्रॉक्झिक्लोरोक्वीन अनेक देशांना निर्यात करण्याचा निर्णय भारताने घेतला. (वृत्तसंस्था)

हायड्रॉक्झिक्लोरोक्वीन औषधावरून अमेरिकेने दिला होता इशारा
भारत हायड्रॉक्झिक्लोरोक्वीन हे औषध अमेरिकेसह ५५ देशांना पाठवत आहे. ते काही देशांना मदतस्वरूपात तर काही देशांमध्ये व्यावसायिक विक्री तत्त्वावर पाठविण्यात येणार आहे. हायड्रॉक्झिक्लोरोक्वीन अमेरिकेला पाठवावे म्हणून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून विनंती केली होती. त्यानंतर काही दिवसांनी ‘हायड्रॉक्झिक्लोरोक्वीन औषध अमेरिकेला न पाठविल्यास भारताला गंभीर परिणाम भोगावे लागतील’ असे ट्रम्प म्हणाले होते.

Web Title: UN chief Antonio Guterres salutes India for helping others in fight against Covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.