पॉर्नस्टार असल्याचे समजताच 'तिने' गमावली शिक्षिकेची नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2016 09:18 AM2016-11-03T09:18:32+5:302016-11-03T09:18:32+5:30
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही सिक्रेटस असतात. आपण आपल्या अत्यंत निकटच्या विश्वासातल्या माणसाला हे सिक्रेटस सांगतो.
Next
ऑनलाइन लोकमत
मॉस्को, दि. ३ - प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही सिक्रेटस असतात. आपण आपल्या अत्यंत निकटच्या विश्वासातल्या माणसाला हे सिक्रेटस सांगतो. पण काही जण दुहेरी आयुष्य जगत असतात. जगासमोर त्यांच एक आयुष्य असत पण दुसरीबाजू ते कधीही उघड करत नाहीत. ही दुसरी बाजू खूपच धक्कादायक असते.
रशियातील अशाच एका प्रकरणात स्वेतलाना तोपोल या शिक्षिकेला तिच्या सिक्रेट लाईफची किंमती नोकरी सोडून चुकवावी लागली. स्वेतलाना एकाचवेळी दोन आयुष्य जगत होती. एकाबाजूला शाळेत शिक्षिकेची नोकरी करणारी स्वेतलाना प्रत्यक्षात पॉर्नस्टार म्हणून अॅडल्ट फिल्ममध्ये काम करत होती. विद्यार्थी आणि अन्य स्टाफला स्वेतलानाच्या पॉर्नस्टार असल्याची ओळख समजताच तिला नोकरीचा राजीनामा द्यावा लागला.
प्रत्यक्षात पॉर्नस्टार असूनही स्वेतलानाचे शाळेतील वर्तन शिक्षकी पेशाला साजेसेच होते. स्वेतलानाच्या विरोधकांनी तिचे व्हिडीओ लीक करुन शाळेपर्यंत ती पॉर्नस्टार असल्याची माहिती पोहोचवली. शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाल्यापासून स्वेतलानाने अॅडल्ट फिल्ममध्ये काम करणे बंद केले होते अशी चर्चा आहे. पण ज्याने व्हिडीओ लीक केले त्याने हे व्हिडीओ या वर्षातलेच असल्याचे सांगितले.
लीक व्हिडीओ हंगेरी, झेक प्रजासत्ताक या देशांमधले आहेत तिथे स्वेतलानाला काम करण्याचे रशियापेक्षा जास्त पैसे मिळायचे. स्वेतलानाच्या राजीनाम्यावरुन रशियामध्ये वेगवेगळ मतप्रवाह आहेत. स्वेतलानाचा राजीनामा घेऊन योग्य निर्णय घेतला असे काहीजणांचे मत आहे. त्याचवेळी पॉर्नस्टार असण्याचा तिने शिक्षक म्हणून आपल्या कामावर काही परिणाम होऊ दिला नाही त्यामुळे तिचा राजीनामा घ्यायला नको होता असे काही जणांचे मत आहे.