भाकरीच्या चंद्राला किंमत जगभरात वेगवेगळी, विचार करायला लावणारी आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 11:06 AM2018-04-25T11:06:16+5:302018-04-25T11:08:08+5:30
जगातील प्रगत देशांमध्ये लोकांना आपल्या उत्पन्नाचा अत्यंत लहानसा भाग रोजच्या जेवणावर खर्च करावा लागतो, गरीब देशांमध्ये मात्र हे प्रमाण अगदी उलट आहे.
न्यू यॉर्क - जगाची वाढत चाललेली संख्या आणि पोटाची खळगी भरण्यासाठी चाललेली धडपड आपल्याला नवी आहे. पण एकवेळच्या जेवणाच्या ताटाचे मूल्यही जगभरात अत्यंत असमान असल्याचेे पाहून तुम्हाला धक्का बसेल. जगातील प्रगत देशांमध्ये लोकांना आपल्या उत्पन्नाचा अत्यंत लहानसा भाग रोजच्या जेवणावर खर्च करावा लागतो, गरीब देशांमध्ये मात्र हे प्रमाण अगदी उलट आहे. वर्ल्ड फूड प्रोग्रामच्या संशोधकांनी दिलेल्या अहवालातून ही असामनता आणि अविकसित देशांची स्थिती समोर आली आहे. जगभरातील विविध देशांतील लोकांचे उत्पन्न आणि त्यांचा रोजच्या खाण्यावर होणारा खर्च या दोन मुद्द्यांचा या अहवालात विचार करण्यात आला आहे.
अमेरिकेत न्यू यॉर्कमध्ये राहाणारी व्यक्ती आपल्या उत्पन्नातील केवळ 0.6% (1.20$) रक्कम रोजच्या जेवणावर खर्च करते , 600 किलोकॅलरीसाठी लागणा-या खाण्याच्या वस्तू त्या रकमेत सहज येऊ शकतात. इतक्या पोषणमूल्यासाठी भारतीय व्यक्तीला मात्र आपल्या उत्पन्नाच्या ४.५% इतका खर्च करावा लागतो किंवा त्यांच्या खाण्याचा खर्च 9.25 डॉलर्स इतका आहेे.
हे झालं अमेरिकेसारख्या विकसित आणि भारतासारख्या विकसनशील देशाचंं उदाहरण. मात्र आफ्रिकेतील देशांमध्ये यातुलनेत अत्यंत वाईट स्थिती आहे. या खंडातील गरीब देशांमधील लोकांचा बहुतांश खर्च केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी होतो तसेच केवळ पोट भरण्यासाठीच त्यांना काम करावे लागते. सुदानमधील व्यक्तीला रोजच्या उत्पन्नाच्या 155% खर्च जेवणावर करावा लागतो. याचा अर्थ दिवसभर काम करुनही येथील लोक अर्धपोटीच राहातात. तर अटलांटिक नहासागरातील हैती बेटांवरील नागरिकांना जेवणासाठी रोजच्या उत्पन्नातील 35 % वाटा बाजूला काढावा लागतो. दक्षिण सुदानमधील नागरिकांचे भाग्य नव्या स्वायत्त देशाच्या निर्मितीनंतरही बदललेले नाही. उत्तम पिकाऊ जमीन, खाणकाम असे उद्योग शक्य असले तरी वारंवार येणारे पूर, पायाभूत सुविधांचा अभाव, अंतर्गत अशांतता यामुळे त्याचा काहीच फायदा नागरिकांना होत नाही. दक्षिण सुदानमधील नागरिकाला जेवणासाठी 321.70 डॉलर्स इतका खर्च करावा लागत.