सामूदायिक विवाहाचा अनोखा ब्राझील, सुरत पॅटर्न
By admin | Published: December 1, 2014 11:45 PM2014-12-01T23:45:12+5:302014-12-01T23:45:12+5:30
ब्राझीलची राजधानी रिओ दी जानेरिओ येथे पार पडलेल्या सर्वांत मोठ्या सामूदायिक सोहळ्यात सुप्रसिद्ध मारासाना मैदानावर सुमारे १,९६० जोडपी विवाहबद्ध झाली.
रिओ दी जानेरिओ : ब्राझीलची राजधानी रिओ दी जानेरिओ येथे पार पडलेल्या सर्वांत मोठ्या सामूदायिक सोहळ्यात सुप्रसिद्ध मारासाना मैदानावर सुमारे १,९६० जोडपी विवाहबद्ध झाली. लग्न खर्चाचा भार उचलू शकत नसलेल्या कमी उत्पन्न गटातीला कुटुंबांना हातभार म्हणून दरवर्षी सरकारतर्फे सामूदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
रिओत आयोजित या भव्य समारंभास सुमारे १२ हजार लोक जमले होते. यामध्ये वधू-वरांशिवाय त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, अधिकारी, न्यायाधीश, एक कॅथॉलिक धर्मगुरू आणि एक ख्रिश्चन धर्म प्रचारक यांचा समावेश होता.
प्रशासनाद्वारे ‘आय डू डे’नामक सोहळ्याचे आयोजन करून परवाना व समारंभासाठीच्या हॉलचा खर्च परवडत नसल्याने क्वचितप्रसंगी लग्न न करण्याचा निर्णय घ्यावा लागणाऱ्या युवकांसाठी या मैदानावर साधारणत: मोठमोठे समारंभ आयोजित केले जातात.
या समारंभावेळी लग्न करणारी जोडपी व त्यांच्या मित्रमंडळींनी सांबा स्टार दुदू नोबरे यांच्या सादरीकरणाचा आनंद लुटला. समारंभाला उपस्थित राहण्यासाठी नातेवाईकांनी मोफत लोकल रेल्वे प्रवासाचीही सुविधा प्रशासनाने दिली होती. या विशेष रेल्वेचे ‘आय डू डे ट्रेन’ असे नामकरण करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)