"एक रहा अन्यथा मरा'! ऋषी सुनक यांचा पंतप्रधान होताच पक्षातील खासदारांना मोठा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 02:50 PM2022-10-25T14:50:00+5:302022-10-25T14:51:46+5:30

42 वर्षीय सुनक हे गेल्या दोन शतकांतील ब्रिटनचे सर्वात कमी वय असलेले पंतप्रधान आहेत.

unite or die british pm rishi sunak first message to tory party's mp | "एक रहा अन्यथा मरा'! ऋषी सुनक यांचा पंतप्रधान होताच पक्षातील खासदारांना मोठा संदेश

"एक रहा अन्यथा मरा'! ऋषी सुनक यांचा पंतप्रधान होताच पक्षातील खासदारांना मोठा संदेश

Next

ब्रिटनमध्ये मोठी राजकीय उलथापालथ सुरू असताना पंतप्रधान म्हणून निवडल्या गेलेल्या ऋषी सुनक यांनी आपल्या कंझरव्हेटिव्ह पक्षाच्या खासदारांना मोठा संदेश दिला आहे. सुनक यांनी आपल्या खासदारांना 'एक रहा अन्यथा मरा' या मंत्रावर काम करण्याचा संदेश दिला आहे. मंगळवारी झालेल्या कंझरव्हेटिव्ह पक्षाच्या मिटिंगमध्ये सुनक बोलत होते.

महत्वाचे म्हणजे, 42 वर्षीय सुनक हे गेल्या दोन शतकांतील ब्रिटनचे सर्वात कमी वय असलेले पंतप्रधान आहेत. यातच गमतीशीर गोष्ट म्हणजे, चर्चिल यांच्यानंतर, ते ब्रिटनचे सर्वात कमी उंची असलेले पंतप्रधान असतील. त्यांची उंची 5 फुट 6 इंच एढी आहे. किंग चार्ल्स तृतीय यांच्या भेटीनंतर ते पंतप्रधान म्हणून आपला कारभार सांभाळतील.

काही महिन्यांतच तिसरे पंतप्रधान - 
ब्रिटनची अर्थव्यवस्था रुळावरून घसरवल्याच्या आरोपांचा सामना करत असलेल्या लिझ ट्रस या सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात पंतप्रधान बनल्या होत्या. पण मंगळवारी त्या आपल्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक घेणार आहेत. यानंतर त्या किंग चार्ल्स तृतीय यांची भेट घेतल्यानंतर, आपले पद सोडतील. या बैठकीनंतर, ऋषी सुनकही किंग चार्ल्स यांची भेट घेतील. 

लिझ ट्रस यांनी गुरुवारी राजीनामा दिल्यापासूनच सुनक यांचे नाव चर्चेत होते. त्यांच्या सोबतच बोरिस जॉन्सन आणि पेनी मोरडॉन्ट यांच्या नावाचीही चर्चा होती. पण शेवटी, दोघेही रेसमधून बाहेर पडले आणि भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या नावावर मोहर लागली.

सुनक यांच्या समोर अर्थव्यवस्था सांभाळण्याचे आव्हान - 
पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर ऋषी सुनक आपल्या भाषणात म्हणाले, स्थिर आणि एकसंध पंतप्रधान हे आपले प्राधान्य असेल. पण, कंझर्व्हेटिव्ह पक्षाला एकत्रित ठेवणे सुनक यांच्यासाठी सोपे नाही. ब्रिटनची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा पट्रीवर आणणे अवघड काम आहे. यामुळेच लिझ ट्रस यांनाही आपली खुर्ची गमवावी लागली आहे. ब्रिटनमध्येही निवडणुकीचीही मागणी होत होती, पण टोरी पक्षाने सुनक यांच्यावर विश्वास दर्शवला. सध्याचा संसदेचा कार्यकाळ जानेवारी 2025 पर्यंत आहे. या काळात काही अनपेक्षित घडले नाही, तर सुनक हे पुढील तीन वर्ष ब्रिटनच्या पंतप्रधान पदावर राहतील.
 

Web Title: unite or die british pm rishi sunak first message to tory party's mp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.