अमेरिका आणि इराणमधील तणावाचा फटका भारताला; मोदींच्या निर्णयाकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 11:28 AM2019-06-21T11:28:46+5:302019-06-21T11:29:17+5:30
इराणने सर्वात मोठी चूक केली आहे. ट्रम्प यांनी मोजक्या शब्दात केलेलं ट्विट इराणवर कारवाई करण्याबाबत इशारा असल्याचं बोललं जात आहे.
मुंबई - अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाचा फटका भारतीय विमान प्रवाशांवर होणार आहे. अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सने मुंबई ते नेवार्क मधील विमान उड्डाण सेवा रद्द केली आहे. मुंबईहून अमेरिकेला जाणारं विमान इराणच्या हवाई क्षेत्रातून जात असल्याने अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. इराणकडून अमेरिकेचं ड्रोन पाडल्याने या दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
अमेरिका एअरलाइन्सने सांगितले की, इराणद्वारे अमेरिकेचे ड्रोन पाडल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. ही विमानसेवा पुन्हा कधी सुरु करण्यात येईल याबाबत आता काही सांगण्यात येत नाही. मात्र तणाव जोपर्यंत आहे मुंबई-नेवार्क विमान सेवा निलंबित करण्यात आली आहे.
दरम्यान इराणने अमेरिकेचं ड्रोन पाडल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत इराणला इशारा दिला आहे. ट्विटमध्ये ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, इराणने सर्वात मोठी चूक केली आहे. ट्रम्प यांनी मोजक्या शब्दात केलेलं ट्विट इराणवर कारवाई करण्याबाबत इशारा असल्याचं बोललं जात आहे.
United Airlines statement: Given current events in Iran, United Airlines has conducted a thorough safety and security review of our India service through Iranian airspace and decided to suspend our service between New York/Newark and India (Mumbai) beginning today evening. pic.twitter.com/9QRZuPqvOr
— ANI (@ANI) June 21, 2019
युनायटेड एअरलाइन्सने सांगितले की, अमेरिकेहून भारताला जाणारी विमान सेवा इराणच्या हवाई क्षेत्रातून जात असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव ही विमान उड्डाणं अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे नेवार्कमार्गे अमेरिकेला जाणाऱ्या विमान प्रवाशांना याचा मोठा फटका बसणार आहे. तसेच या परिस्थिती प्रवाशांना बसणारा फटका लक्षात घेता संबंधित सरकारी अधिकाऱ्यांशी बोलून प्रवाशांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्याबाबत विचार सुरु असल्याचं युनायटेड एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
Iran made a very big mistake!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) June 20, 2019
इराणच्या सशस्त्र दलाने गुरुवारी जलसंधी येथील हवाई क्षेत्रात येणाऱ्या अमेरिकेच्या ड्रोनला पाडलं. या शक्तिशाली ड्रोनची किंमत जवळपास 1260 कोटी रुपये होती. इराण आर्मीच्या कमांडरने सांगितले की, संबंधित अमेरिकेचे ड्रोनने इराणच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केल्याने ही कारवाई केली आहे. मात्र अमेरिकेने हा दावा फेटाळून लावला आहे. तसेच अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. तेल उत्पादक व निर्यातदार देशांकडून (ओपेक) तेल पुरवठ्यातील कपात सुरूच राहणार असल्याची शक्यता आहे. त्याचाही तेलाच्या दरांवर परिणाम झाला आहे.