संयुक्त अरब अमिरातने निभावली मैत्री; शपथविधीवेळी टॉवरवर चमकले मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 09:52 AM2019-05-31T09:52:50+5:302019-05-31T09:55:36+5:30
अबु धाबी राष्ट्रीय तेल कंपन्यांची कार्पोरेट कार्यालये या इमारतीमध्ये आहेत.
भाजपाच्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदींनी गुरुवारी सायंकाळी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. संयुक्त अरब अमिरातने यानिमित्ताने अबुधाबीतील एका तेल कंपनीच्या मुख्यालयाच्या इमारतीला मोदींच्या फोटोसह प्रिन्स आणि युएईचे सुप्रिम कमांडरचे फोटोंची झळाळी दिली.
अबु धाबी राष्ट्रीय तेल कंपन्यांची कार्पोरेट कार्यालये या इमारतीमध्ये आहेत. या इमारतीवर डिजिटल स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच युएईने मोदींना तेथील सर्वोच्च मानाचा झायेद पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. युएईचे अध्यक्ष शेख खलिफा बीन झायेद अल नाह्यान यांनी हा पुरस्कार दिला होता.
Now this is true friendship! As PM @narendramodi is sworn in for a second term in office, the iconic @AdnocGroup tower in Abu Dhabi is lit up with India and UAE flags and portraits of our PM and of HH Sheikh @MohamedBinZayed@IndianDiplomacy@PMOIndiapic.twitter.com/fnlkEdPHFW
— IndAmbUAE (@navdeepsuri) May 30, 2019
भारतासोबतच्या ऐतिहासिक मैत्री आणि धोरणांसाठी नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे मैत्रीपूर्ण संबंध उपयुक्त ठरतील. यामुळेच त्यांना झायेद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल आहे, असे अबु धाबीचे प्रिन्स मोहम्मद बीन झायेद यांनी ट्विट केले आहे.
मोदी यांचे फोटो इमारतीवर झळकवितानाचा व्हिडीओ तेथील भारतीय दूतावासाने ट्विट केला आहे.