आनंदाची बातमी...! कोरोना लस आली...!; पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 2, 2020 01:32 PM2020-12-02T13:32:56+5:302020-12-02T13:33:39+5:30

काही दिवसांपूर्वीच फायझर कंपनीने घोषणा केली होती, की त्यांना लॅबमध्ये COVID-19 अर्थात कोरोनावरील एक अशी लस तयार करण्यात यश आले आहे, जी कोरोनाविरोधात 96% प्रभावी ठरली आहे. (Pfizer, Biontech)

United Kingdom has become the first country in the Western country to approve the corona vaccine | आनंदाची बातमी...! कोरोना लस आली...!; पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात

आनंदाची बातमी...! कोरोना लस आली...!; पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात

Next

लंडण - युनायटेड किंगडमने फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशीला मंजुरी दिली आहे. अमेरिका आणि यूरोपीय संघाच्या निर्णयाने फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लशीला मंजुरी देणारा युनायटेड किंगडम पश्चिमेकडील पहिला देश बनला आहे. ही लस पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये उपलब्ध होईल.

काही दिवसांपूर्वीच फायझर कंपनीने घोषणा केली होती, की त्यांना लॅबमध्ये COVID-19 अर्थात कोरोनावरील एक अशी लस तयार करण्यात यश आले आहे, जी कोरोनाविरोधात 96% प्रभावी ठरली आहे. जर्मनीची बायोफार्मास्यूटिकल कंपनी बायोएनटेक आणि तिची अमेरिकन सहकारी कंपनी फायझरने युरोपिय संघासमोर कालच लशीच्या रजिस्ट्रेशनसाठी औपचारिक अर्ज केला होता.

ग्लंडची मेडिसिन आणि हेल्थकेअर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी (एमएचआरए)ने फायझर आणि बायोएनटेक कोरोना व्हायरस लशीचे मुल्यांकन करण्याची परवानगी दिली. एवढेच नाही, तर ही संस्था, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेकाची लस कठोर सुरक्षिततेच्या मानकांना पूर्ण करते, की नाही, हेदेखील निर्धारित करण्याच्या प्रक्रियेत आहे.

इंग्लंडचे मंत्री नादिम जहावी यांचा हवाला देत एका माध्यमाने आपल्या वृत्तात म्हटले आहे, की सर्व काही ठरलेल्या योजनेप्रमाणे पार पडले आणि फायझ व बायोएनटेकने विकसित केलेल्या लशीला प्राधिकरणाची मान्यता मिळाली तर त्याच्या काही तासांतच लशीच्या वितरणाला आणि लसिकरणाला सुरुवात करण्यात येईल. 

कंपनीचा दावा - तिसऱ्या टप्प्यावर 90% यशस्वी ठरली लस -
फायझरचे अध्यक्ष आणि सीईओ डॉ. अल्बर्ट बोरला यांनी म्हटले होते, की हा विज्ञान आणि मानवतेच्या दृष्टीने मोठा दिवस आहे. तिसऱ्या टप्प्यावरील परिक्षणाच्या निकालाच्या पहिल्या सेटवरून स्पष्ट होऊ लागले आहे, की आमची लस कोरोनाचा सामना करण्यात प्रभावी आहे. कंपनीनुसार, ट्रायलमध्ये फायझरची लस कोरोनाला रोखण्यात 90 टक्के यशस्वी ठरल्याचे दिसून आले आहे. यात कोरोनाच्या 94 प्रकरणांची पुष्टी करण्यात आली. या अभ्यासात एकूण 43,538 स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. यांपैकी 42 टक्के कोल असे होते, ज्यांनी कोरोना व्हायसच्या दृष्टीने फारशी खबरदारी घेतली नव्हती. 
 

Read in English

Web Title: United Kingdom has become the first country in the Western country to approve the corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.