भारत-पाक मतभेद दूर करण्यास संयुक्त राष्ट्रे तयार
By admin | Published: April 10, 2016 02:03 AM2016-04-10T02:03:54+5:302016-04-10T02:03:54+5:30
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी आपण मदत करण्यास तयार आहोत, असे संयुक्त राष्ट्र सरचिटणीस बान की मून यांनी स्पष्ट केले आहे; मात्र अशा प्रकारची
संयुक्त राष्ट्रे : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी आपण मदत करण्यास तयार आहोत, असे संयुक्त राष्ट्र सरचिटणीस बान की मून यांनी स्पष्ट केले आहे; मात्र अशा प्रकारची मदत हवी की नाही, हे दोन्ही देशांनाच ठरवावे लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
भारतासोबतची शांतता प्रक्रिया ‘निलंबित’ केल्याची घोषणा गेल्या गुरुवारी पाकिस्तानने केली. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांतर्फे हा प्रस्ताव आला आहे. बान यांचे प्रवक्ता स्तेफाने दुयारिच यांनी पत्रकारांना सांगितले की, जेव्हा सदस्य देशांत मतभेद होतात तेव्हा कर्तव्य म्हणून सरचिटणीस मदतीचा प्रस्ताव मांडतात; पण हा प्रस्ताव स्वीकारायचा की नाही हे त्या दोन देशांवर अवलंबून आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांतता प्रक्रिया पुन्हा ‘बाधित’ झाली आहे या स्थितीत सरचिटणीस मदत करणार काय? असे विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले. (वृत्तसंस्था)