म्यानमारवरील प्रतिबंध हटविण्याची अमेरिकेची घोषणा
By admin | Published: October 8, 2016 02:53 AM2016-10-08T02:53:25+5:302016-10-08T02:53:25+5:30
म्यानमारवर लादलेला प्रतिबंध काढून घेत असल्याची औपचारिक घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शुक्रवारी केली.
ऑनलाइन लोकमत
वाॅशिंग्टन, दि. 8 - म्यानमारवर लादलेला प्रतिबंध काढून घेत असल्याची औपचारिक घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शुक्रवारी केली. गत महिन्यात म्यानमारच्या नेत्या ऑग सान सू की आणि ओबामा यांच्यात वाश्गिंटन येथे झालेल्या भेटीनंतर ही घोषणा झाली आहे.
म्यानमार येथील सैन्य शासन अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याची सबब पुढे करून अमेरिकेने म्यानवर प्रतिबंध लादले होते. आता लोकतांत्रिकपद्धतीने निवडलेले सरकार असल्यामुळे अमेरिकेने प्रतिबंध उठवले असून, या माध्यमातून लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सुतोवाच ओबामा यांनी केले; मात्र यामुळे कुठलेही सैन्य मदत देण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.