दहशतवादाविरोधात अमेरिका, सौदी अरेबिया एकत्र

By admin | Published: April 1, 2016 05:46 PM2016-04-01T17:46:52+5:302016-04-01T17:46:52+5:30

पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा आणि इतर दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याचा करार

United States, Saudi Arabia together with terrorism | दहशतवादाविरोधात अमेरिका, सौदी अरेबिया एकत्र

दहशतवादाविरोधात अमेरिका, सौदी अरेबिया एकत्र

Next

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 1- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रियाधला भेट दिलीय. याभेटीदरम्यान यूएस आणि सौदी अरेबियानं भारतासोबत एकत्रितरीत्या पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा आणि इतर दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याचा करार झाला आहे.
अल कायदा, तालिबान, लष्कर ए तोयबा या संघटनांना मिळणारा पैसा गोठवण्यासाठी भारतासह यूएस आणि सौदी अरेबिया प्रयत्न करणार आहेत. अल कायदा, तालिबान, लष्कर ए तोयबानं अनेक अमेरिकन नागरिकांसह दक्षिण आशिया आणि सौदी अरेबियातील लोकांना हानी पोहोचवल्याची असल्याची माहिती यावेळी  दहशतवादविरोधी पथकाचे सचिव अदम सुझबिन यांनी दिलीय.
लष्कर ए तोयबाच्या नवीद क्वामर, अब्दुल अजिज नुरिस्तानी, मोहम्मद इझाज सफराश, भारतातल्या 26/11 या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड झकी उर रेहमान लक्वीवरही कारवाई  करण्यात येणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अणुकरार झाल्यानंतर रियाधमधून मुक्काम हलवणार आहेत..भारत-युरोप भेटीसाठी बेल्जियमला जाणार आहेत. त्यानंतर ते वॉशिंग्टनलाही भेट देणार आहेत.
 

Web Title: United States, Saudi Arabia together with terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.