अमेरिकेत महिलेचा विनातिकीट विमान प्रवास
By admin | Published: August 8, 2014 08:29 PM2014-08-08T20:29:56+5:302014-08-08T20:29:56+5:30
तिकिटाशिवाय विमान प्रवासाची आपण कल्पना करू शकतो का, ते ही अमेरिकेत, नाही ना? ही असाध्य बाब एका ६२ वर्षाच्या अमेरिकन महिलेने हे केली आहे
ऑनलाइन टीम
न्यूयॉर्क, दि. ८ - तिकिटाशिवाय विमान प्रवासाची आपण कल्पना करू शकतो का, ते ही अमेरिकेत, नाही ना? ही असाध्य बाब एका ६२ वर्षाच्या अमेरिकन महिलेने हे केली आहे. साउथवेस्ट एअरलाइन्सच्या सेंट जोस ते लॉस अँजिलीस पर्यंतचा प्रवास तिने विना तिकीट केला आहे. त्या महिलेचे नाव मेरिलिन जीन हार्टमॅन असे आहे. सेंट जॉस विमानतळावरील सुरक्षारक्षकांना गुंगारादेत तिने विमानात प्रवेश मिळवला. तपासणी दरम्यान तिच्या पुढ्यात कोणतीही संशयास्पद वस्तू नसल्याने तिला सहज विमानातळात प्रवेश मिळाला. एका कुटूंबाची सदस्य असल्याचे भासवत तिने बोर्डिंगपास काऊंटरवरील कर्मचा-यांच्या डोळ्यात धुळफेक केली. पुढे विमानात गेल्यावर एका रिकाम्या सिटवर बसून तिने आरामात सेंट जोस ते लॉसअँजिलीस असा प्रवास केला.
लॉसअँजिलीसच्या विमानतळावर तिला पकडण्यात आले आणि न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या घटनेबद्दल तिने दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतू, आपण विमानात कसा प्रवेश मिळवला हे सर्वांसमोर सांगण्यास तिने नकार दिला आहे. ही युक्ती सांगितल्यास देशाच्या सुरक्षेला धोका पोहचू शकतो असे तिने म्हटले आहे. तसेच हे गैरवर्तन असल्याचेही तिने म्हटले आहे.