ग्रीसच्या बेलआऊट पॅकेजवर युरोझोनमध्ये एकमत
By admin | Published: July 13, 2015 01:38 PM2015-07-13T13:38:34+5:302015-07-13T14:24:37+5:30
आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रीसला बेलआऊट पॅकेज देण्यावर युरोझोनमध्ये एकमत झाले आहे. युरोपियन परिषदेचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी ट्विटरद्वारे ही घोषणा केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
ब्रुसेल्स, दि. १३ - आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रीसला बेलआऊट पॅकेज देण्यावर युरोझोनमध्ये एकमत झाले आहे. युरोपियन परिषदेचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी ट्विटरद्वारे ही घोषणा केली असून ग्रीसच्या बेलआऊट पॅकेजचे वृत्त समजताच भारतीय शेअर बाजारही वधारला आहे.
कर्जबाजारीपणामुळे आर्थिक संकटात सापडलेला ग्रीस व युरोपियन महासंघातील अन्य देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. युरोपियन महासंघाचे आर्थिक निर्बंधांचे पालन करण्यास ग्रीसने नकार दिला होता. ग्रीसमधील जनमतात युरोपियन महासंघाविरुद्ध मतदान झाले होते. यामुळे परिस्थिती आणखी चिघळली होती. ग्रीसला युरोझोनमधून बाहेर पडायचे की नाही यासंदर्भात युरोझोनमधील नेत्यांची तब्बल १७ तास बैठक पार पडली. या बैठकीत ग्रीसला युरोझोनमध्ये ठेऊन त्यांना तिस-यांदा बेलआऊट पॅकेज देण्याचा निर्णय झाला अशी माहिती डोनाल्ड डस्क यांनी दिली. ग्रीसला ८६ बिलियन युरोचे पॅकेज मिळणार असून ग्रीसचे पंतप्रधान अलेक्सिस तिसिप्रास यांनीदेखील या पॅकेजला संमती दर्शवल्याचे समजते. बेलआऊट पॅकेजच्या घोषणेचे भारताच्या शेअरबाजारातही सकारात्मक पडसाद उमटले.