"युनिव्हर्सिटी ऑफ जिहाद'ला पाकचं पाठबळ, 30 कोटी केले मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2016 10:25 PM2016-06-19T22:25:04+5:302016-06-19T22:25:04+5:30

युनिव्हर्सिटी ऑफ जिहाद या मदरशाला पाकिस्तानमधील खैबर पख्तुन ख्वाँ राज्यातील सरकारने तब्बल 30 कोटी पाकिस्तानी रुपयांचा निधी दिला आहे.

"University of Jihad" has been supported by Pakistan, has been sanctioned 30 crores | "युनिव्हर्सिटी ऑफ जिहाद'ला पाकचं पाठबळ, 30 कोटी केले मंजूर

"युनिव्हर्सिटी ऑफ जिहाद'ला पाकचं पाठबळ, 30 कोटी केले मंजूर

Next

ऑनलाइन लोकमत

पेशावर, दि. 19-  युनिव्हर्सिटी ऑफ जिहाद या मदरशाला पाकिस्तानमधील खैबर पख्तुन ख्वाँ राज्यातील सरकारने तब्बल 30 कोटी पाकिस्तानी रुपयांचा निधी दिला आहे. या मदरसामध्ये तालिबानचा म्होरक्‍या मुल्ला ओमर याच्यासहित इतर अनेक अफगाण तालिबानी दहशतवाद्यांनी शिक्षण घेतल्याची माहिती आता समोर येते आहे. ओमर याला या मदरसाकडून मानद डॉक्‍टरेटही दिल्याची खळबळजनक माहिती मिळते आहे. 

दारुल उलूम हक्कानिया नौशेरा मदरशास 30 कोटींचा निधी मंजूर करताना मला अभिमान वाटत आहे, असे या राज्यातील मंत्री शाह फरमान यांनी म्हटले आहे. मशिदी आणि मदरशांनाही सरकारकडून निधी देण्यात येणार आहे. तेहरिक-इ-इन्साफ या इम्रान खान यांच्या पक्षाची या राज्यात सरकार आहे. धार्मिक संस्थांवर छापे न मारता त्यांना आर्थिक मदत देण्याचे आमचं धोरण असल्याचा फतवा त्यांनी काढला आहे. 
1947 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या मदरशाचे मुख्य सध्या मौलवी सामी उल-हक आहेत. मौलवी पाकिस्तानमधील 40 पेक्षा जास्त संघटनांची एकत्रित संस्था असलेल्या दिफा-इ-पाकिस्तानचेही अध्यक्ष आहेत. दिफा-इ-पाकिस्तानमध्ये जमात उल दावा आणि सिपाह-इ-सहाबा अशा दहशतवादी संघटनांचाही समावेश असल्याची माहिती मिळते आहे. 

Web Title: "University of Jihad" has been supported by Pakistan, has been sanctioned 30 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.