टिवटरवर आता अपलोड करा १४० सेकंदाचा व्हिडीओ

By admin | Published: June 22, 2016 10:10 AM2016-06-22T10:10:06+5:302016-06-22T10:35:09+5:30

टिवटरवर शब्दमर्यादा १४० शब्दांपर्यंत वाढवल्यानंतर आता टिवटरवर व्हिडीओची लांबीही वाढवण्यात आली आहे.

Upload now to Twitter, 140 seconds of video | टिवटरवर आता अपलोड करा १४० सेकंदाचा व्हिडीओ

टिवटरवर आता अपलोड करा १४० सेकंदाचा व्हिडीओ

Next

ऑनलाइन लोकमत 

न्यूयॉर्क, दि. २२ - सेलिब्रिटी आणि चाहत्यांमध्ये महत्वाचा दुवा ठरलेल्या टि्वटरवर शब्दमर्यादा १४० शब्दांपर्यंत वाढवल्यानंतर आता टि्वटरवर व्हिडीओची लांबीही वाढवण्यात आली आहे. टि्वटर युझर्सना आता १४० सेकंदाचा व्हिडीओ पोस्ट करता येणार आहे. 
 
फेसबुक आणि गुगलच्या यूटयुबच्या तुलनेत टि्वटर मागे पडत असल्यामुळे हा नवीन बदल करण्यात आला आहे. युझर्स टिकवणे आणि वाढवणे हे दोन त्यामागे मुख्य उद्देश आहेत. टि्वटरवर आता १४० सेंकंदाचे व्हिडीओ तुम्ही अपलोड करु शकता. 
 
टि्वटरवर व्हिडीओ प्रसिद्ध करणा-याला त्यातून पैसे कमावण्याची सुविधाही टि्वटर उपलब्ध करुन देणार आहे. यापूर्वी टिवटरवर फक्त ३० सेंकंदाचा व्हिडीओ अपलोड करता येत होता. त्याशिवाय टि्वटरने टिवटर एंगेज हे नवे मोबाईल अॅपही विकसित केले आहे. 

Web Title: Upload now to Twitter, 140 seconds of video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.