बापरे! लहान मुलांची काळजी घ्या; जगात झपाट्याने वाढतोय कोरोनापेक्षाही 'हा' भयंकर व्हायरस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 12:05 PM2024-01-14T12:05:22+5:302024-01-14T12:16:37+5:30

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने यावर चिंता व्यक्त केली आहे.

urgent warning measles outbreak in britain worst than corona virus save your children from this vaccine | बापरे! लहान मुलांची काळजी घ्या; जगात झपाट्याने वाढतोय कोरोनापेक्षाही 'हा' भयंकर व्हायरस

बापरे! लहान मुलांची काळजी घ्या; जगात झपाट्याने वाढतोय कोरोनापेक्षाही 'हा' भयंकर व्हायरस

जग कोरोना व्हायरसच्या व्हेरिएंटमुळे हैराण झाले आहे, तर दुसरीकडे अनेक नवीन व्हायरसच्या जन्मामुळे जग तणावाखाली आहे. इंग्लंड आणि वेल्सला एका व्हायरसचा फटका बसला आहे. ज्यामुळे लहान मुलांसाठी मोठा धोका निर्माण झाला. इंग्लंड आणि वेल्समध्ये व्हिक्टोरियन आजाराची प्रकरणं वाढत आहेत. याबाबत डॉक्टरांनी गंभीर इशारा दिला आहे. या धोकादायक व्हायरसच्या वाढीसह, शास्त्रज्ञांना भीती आहे की, तो चिमुकल्यांसाठी सर्वात मोठा धोका निर्माण करेल.

द सनच्या रिपोर्टनुसार, गोवर असं या आजाराचं आहे. कुटुंबांनी आपल्या मुलांना MMR लस देण्यास नकार दिल्यामुळे आजार संपूर्ण ब्रिटनमध्ये पसरत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आरोग्य संरक्षण सल्लागार डॉ. नावेद सय्यद यांनी वेस्ट मिडलँड्समधील प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं पाहून चिंता व्यक्त केली. किमान एकदाही लसीकरण न झालेल्या रुग्णांमध्ये हा व्हायरस झपाट्याने पसरण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला. इंग्लंडमध्ये गोवरच्या 149 प्रकरणांची नोंद झाली आहे. यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी (UKHSA) नुसार, हा जानेवारी आणि सप्टेंबर 2023 चा डेटा आहे. 2022 च्या तुलनेत, तेव्हा 54 प्रकरणे होती.

नवीन आकडेवारी 2010-11 पासून दिलेल्या MMR लसींची सर्वात कमी संख्या दर्शवते. केवळ 84.5 टक्के मुलांना दोन्ही लसी मिळाल्या आहेत. यामध्ये हे दोन्ही डोस पाच वर्षापर्यंतच्या मुलांना देण्यात आले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने यावर चिंता व्यक्त केली आहे, कारण लंडनमधील अनेक कुटुंब त्यांच्या मुलांना MMR लसीचे दोन शॉट्स वयाच्या चार वर्षांपर्यंत देत नाहीत.

इंडियन अका़डमी ऑफ पीडियाट्रिक्स (IAP) 9 महिने वय असताना गोवर लसीची शिफारस करतं. पहिल्या डोसनंतर, 9 महिन्यांपेक्षा जास्त वयाची 85% मुलं आणि 12 महिन्यांपेक्षा जास्त वयाची 95% मुलं संरक्षित आहेत. लसीकरण दर कमी झाल्यास गोवर पुन्हा होऊ शकतो. या लसीकरणाची परिणामकारकता अनेक वर्षे प्रभावी राहते. 

Web Title: urgent warning measles outbreak in britain worst than corona virus save your children from this vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.