उरीचा हल्ला भारतानंच घडवला - पाकच्या उलट्या बोंबा

By admin | Published: September 20, 2016 01:33 PM2016-09-20T13:33:57+5:302016-09-20T13:33:57+5:30

उरी इथला दहशतवादी हल्ला शीख व मुस्लीमांमध्ये तेढ वाढावी म्हणून भारताने घडवल्याचा हास्यास्पद जावईशोध पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी लावला आहे.

Uri attacked in India - Pak vomit bomba | उरीचा हल्ला भारतानंच घडवला - पाकच्या उलट्या बोंबा

उरीचा हल्ला भारतानंच घडवला - पाकच्या उलट्या बोंबा

Next
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 20 - उरी इथला दहशतवादी हल्ला शीख व मुस्लीमांमध्ये तेढ वाढावी म्हणून भारताने घडवल्याचा हास्यास्पद जावईशोध पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी लावला आहे. काश्मिरमधल्या मुस्लीमांच्या लढ्याला शीखांनी पाठिंबा देऊ नये म्हणून शीखांचं प्राबल्य असलेल्या उरीची खोट्या दहशतवादी हल्ल्यासाठी निवड करण्यात आल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्याने पाकिस्तानी वृत्तपत्राने दिले आहे.
पाकिस्तानमधल्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी शीखांचा स्वतंत्र काश्मिर मागणाऱ्या मुस्लीमांना पाठिंबा असल्याचे सांगत हिंदूंचा वरचश्मा असलेल्या सरकारनं शीख व मुस्लीमांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हा बनाव रचल्याचा हास्यास्पद कांगावा केला आहे.
काश्मिरमधला हिंसाचार लपवणे, पाकिस्तानवर दहशतवादाचा आरोप करणे, शीख व मुस्लीमांमध्ये तेढ निर्माण करणे आणि नवाझ शरीफ यांच्या संयुक्त राष्ट्रातील संदेशाचं महत्त्व कमी करणे असे अनेक पक्षी एका दगडात मारण्याचा प्रयत्न घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यातून भारत करत असल्याचं या सुरक्षा अधिकाऱ्याने दी न्यूज इंटरनॅशलला सांगितलं आहे.
 
आणखी वाचा
 
कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यास आम्ही सज्ज - राहील शरीफ
पाकिस्तानला धडा शिकवण्याचे भारतासमोर 'हे' सहा पर्याय
तडकाफडकी लष्करी कारवाई टाळा - कमांडर्सचा सरकाला सल्ला
 
जर, भारताने नियंत्रणरेषेवर कुंपण घातले आहे आणि लेझर सेन्सर बसवले आहेत, तर सीमेपलिकडून घुसखोरी होऊच कशी शकेल असा सवालही या वृत्तपत्रात विचारण्यात आला आहे. जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या व अत्याधुनिक उपकरणे असलेल्या भारतीय लष्कराला चकमा देऊन मूठभर दहशतवादी असा हल्ला घडवूच कसा शकतात अशी खिल्लीही उडवण्यात आली आहे.

Web Title: Uri attacked in India - Pak vomit bomba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.