74 वर्षीय महिला शिक्षिका विद्यार्थ्याच्या लैंगिक शोषणासाठी दोषी, होऊ शकते 600 वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 09:58 AM2023-08-07T09:58:45+5:302023-08-07T10:01:19+5:30
US Crime News : दोषी महिला तोमहामधील एका खाजगी शाळेत शिकवत होती आणि इथे 2016-17 दरम्यान शाळेच्या बेसमेंटमध्ये अल्पवयीन मुलाचं अनेक तिने लैंगिक शोषण केलं.
US Crime News : अमेरिकेच्या विस्कॉन्सिनच्या मोनरो काउंटीमध्ये एका 74 वर्षीय माजी महिला शिक्षिकेला आपल्या एका विद्यार्थ्याच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात दोषी ठरवण्यात आलं आहे. दोषी महिलेला याप्रकरणी शेकडो वर्षांची शिक्षा होऊ शकते. शिक्षेची सुनावणी 27 ऑक्टोबरला केली जाणार आहे. मोनरो काउंटी डिस्ट्रिक्ट अटॉर्नी केविन क्रोनिंगर यांच्यानुसार, नेल्सन-कोचला 600 वर्षांच्या शिक्षेचा सामना करावा लागू शकतो.
मीडिया रिपोट्सनुसार, 74 वर्षीय ऐनी एन. नेल्सन-कोचला सोमवारी आपल्या 14 वर्षीय विद्यार्थ्याचं 25 वेळा लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात दोषी ठरवण्यात आलं.
दोषी महिला तोमहामधील एका खाजगी शाळेत शिकवत होती आणि इथे 2016-17 दरम्यान शाळेच्या बेसमेंटमध्ये अल्पवयीन मुलाचं अनेक तिने लैंगिक शोषण केलं. त्यावेळी नेल्सन-कोच ही 67 वर्षाची तर मुलगा 14 वर्षाचा होता.
फॉक्स न्यूजनुसार, तीन दिवसांच्या सुनावणीनंतर महिला दोषी ठरवण्यासाठी ज्यूरीने केवळ 5 मिनिटे विचार विनिमय केला. सहायक जिल्हा अटॉर्नी सारा एम. स्काइल्स यानी पीडितबाबत सांगितलं की, या गुन्ह्याचा शिकार एक अविश्वसनिय रूपाने बहादूर मुलगा आहे. त्याने खरं सांगितलं आणि ज्यूरीने त्याला स्पष्टपणे ऐकलं.
स्काइल्स यानी न्यायाधीशांना नेल्सन-कोचला शिक्षा सुनावली जाईपर्यंत तुरूंगात ठेवण्याची विनंती केली. पण मोनरो काउंटी सर्किट कोर्टाचे न्यायाधीश रिचर्ड रैडक्लिफ यानी दोषीला 27 ऑक्टोबरपर्यंत जीपीएस मॉनिटर लावून सोडून दिलं.