भारतानंतर चीनवर अमेरिकेची कारवाई; TikTok, Wechat बंदीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 09:42 AM2020-08-07T09:42:46+5:302020-08-07T09:44:08+5:30

ट्रम्प यांनी गुरुवारी सायंकाळी चिनी अॅप TikTok आणि Wechat अॅप अमेरिकेत 45 दिवसांच्या आत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

US action on China after India; TikTok, Wechat ban orders by donald trump | भारतानंतर चीनवर अमेरिकेची कारवाई; TikTok, Wechat बंदीचे आदेश

भारतानंतर चीनवर अमेरिकेची कारवाई; TikTok, Wechat बंदीचे आदेश

Next

वॉशिंग्टन : चीनविरोधात भारतानंतर अमेरिकेने आघाडी उघडली असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी अॅप TikTok आणि Wechat च्या मालकांशी कोणत्याही प्रकारच्या व्यवहारांवर बंदी आणली आहे. एवढेच नाही तर मॉयक्रोसॉफ्ट किंवा अन्य कोणत्याही अमेरिकी कंपनीला ही अॅप खरेदी करता येणार नाहीत. यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत बॅन करण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्य यांनी यासंबंधी आदेशावर सह्या केल्या आहेत. 


ट्रम्प यांनी गुरुवारी सायंकाळी चिनी अॅप TikTok आणि Wechat अॅप अमेरिकेत 45 दिवसांच्या आत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याआधी सिनेटने एकमताने ही अॅप अमेरिकी अधिकाऱ्यांसाठी बंद करण्यास सहमती दिली होती. ही बंदी गरजेची होती. कारण अविश्वासू अॅपद्वारे अमेरिकन नागरिकांची माहिती गोळा करणे देशाच्या सुरक्षेसाठी धोक्याचे आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले. 


ट्रम्प यांनी सांगितले की, डेटा गोळा केल्याने चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला अमेरिकन नागरिकांच्या खासगी आयुष्याची माहिती मिळते. याद्वारे चीन अमेरिकेच्या कर्मचारी आणि ठेकेदारांचे स्थान ट्रॅक करू शकणार आहे. एवढेच नाही तर याचा वापर चीव ब्लॅकमेलिंगसाठीही करू शकतो. तसेच कार्पोरेट हेरगिरीही करण्याचा धोका आहे. 




टिकटॉक हे अॅप मायक्रोसॉफ्ट विकत घेणार होते. याबाबत बोलणी सुरु होती. मात्र, आता अमेरिकेने बंदी लादल्याने हा व्यवहार फिस्कटणार आहे. सध्यातरी यावर टिकटॉक, मायक्रोसॉफ्ट आणि वुईचॅटकडून कोणताही प्रतिक्रिया आलेली नाही. भारतात दोन महिन्यांपूर्वीच चीनची अनेक अॅप बॅन झाली आहेत.



 

अन्य महत्वाच्या बातम्या...

‘सुसाईड नोट’मध्ये अर्णब गोस्वामीचे नाव, कारवाई करा; शिवसेना आमदाराचे गृहमंत्र्यांना पत्र

Marathi Joke: कोरोना, कुठे फेडशील रे हे पाप??

सिनेसृष्टी हादरली! एकाच दिवसात दुसरी आत्महत्या; अभिनेत्री अनुपमा पाठकने जीवन संपवले

आजचे राशीभविष्य - 7 ऑगस्ट 2020; वृश्चिक राशीचा वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधनांवर खर्च

सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...

 

Web Title: US action on China after India; TikTok, Wechat ban orders by donald trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.