आदेश दिल्यास चीनवर अण्वस्त्र हल्ला करेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 03:15 AM2017-07-28T03:15:35+5:302017-07-28T03:15:49+5:30

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आदेश दिला तर पुढील आठवड्यात मी चीनवर अण्वस्त्राचा हल्ला करेन, असे अमेरिकेच्या पॅसिफिक फ्लीटचे कमांडर अ‍ॅडमिरल स्कॉट स्विफ्ट यांनी गुरुवारी म्हटले.

US Admiral Says He'd Nuke China If Trump Told Him To | आदेश दिल्यास चीनवर अण्वस्त्र हल्ला करेन

आदेश दिल्यास चीनवर अण्वस्त्र हल्ला करेन

Next

कॅनबेरा : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आदेश दिला तर पुढील आठवड्यात मी चीनवर अण्वस्त्राचा हल्ला करेन, असे अमेरिकेच्या पॅसिफिक फ्लीटचे कमांडर अ‍ॅडमिरल स्कॉट स्विफ्ट यांनी गुरुवारी म्हटले.
लष्कराने त्याच्या सरसेनापतीवरील (कमांडर इन चिफ) निष्ठा बदलण्याचा कधीही विचार करू नये, असे सांगताना त्यांनी वरील विधान केले. सैन्यातील अधिकाºयांना त्यांच्या वरिष्ठांचे आदेश मानावेच लागतात, असा या विधानाचा संदर्भ होता.
आॅस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय विद्यापीठ सुरक्षा परिषदेत स्कॉट स्विफ्ट प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते. असा प्रश्न विचारला जाईल, असे त्यांनी गृहीत धरले होते.
आॅस्ट्रेलियाच्या किनाºयापासून दूर अंतरावर अमेरिका आणि आॅस्ट्रेलिया यांच्या लष्कराच्या मोठ्या संयुक्त कवायती झाल्यानंतर ही परिषद झाली. ईशान्य आॅस्ट्रेलियापासून दूर अंतरावर या कवायतींवर चीनच्या गोपनीय माहिती मिळवणाºया जहाजाचे लक्ष होते.
परिषदेला उपस्थित असलेल्या एका अभ्यासकाने स्कॉट स्विफ्ट
यांना प्रश्न विचारले की, डोनाल्ड
ट्रम्प यांनी आदेश दिला तर तुम्ही पुढच्या आठवड्यात चीनवर
अण्वस्त्र हल्ला करणार का? त्यावर स्विफ्ट म्हणाले, ‘त्याचे उत्तर होय असे आहे.’
स्विफ्ट असेही म्हणाले की, अमेरिकन लष्कराच्या प्रत्येक सदस्याने अमेरिकेच्या विदेशातील किंवा देशातील शत्रूंपासून अमेरिकेच्या घटनेचे संरक्षण करेन आणि आमच्यावर जे वरिष्ठ नेमलेले असतात ते आणि कमांडर आणि चिफ असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षांच्या आदेशांचे पालन करेन अशी शपथ घेतलेली असते. त्यामुळे आदेशांचे पालन करावेच लागते. (वृत्तसंस्था)

नागरी नियंत्रणाचे तत्त्व
अमेरिकेच्या लोकशाहीचा गाभा हाच गाभा आहे आणि मुख्य उद्देशापासून आणि नागरी नियंत्रणाशी असलेल्या निष्ठेपासून दूर जाणारे लष्कर असल्यास त्या वेळी आम्हाला खरा प्रश्न निर्माण होईल, असेही स्कॉट स्विफ्ट एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
पॅसिफिक फ्लीटचे प्रवक्ते कॅप्टन चार्ली ब्राऊन नंतर म्हणाले की, लष्करावर नागरी नियंत्रणाचे जे तत्त्व आहे तेच स्विफ्ट यांच्या उत्तराने निग्रहाने पुन्हा सांगितले आहे.

Web Title: US Admiral Says He'd Nuke China If Trump Told Him To

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.