अमेरिकेने शाहरुखला पुन्हा अडवलं, नंतर मागितली माफी
By Admin | Published: August 12, 2016 07:44 AM2016-08-12T07:44:13+5:302016-08-12T12:02:31+5:30
बॉलिवूड बादशाह शाहरुख खानला अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाने ताब्यात घेतलं आहे. स्वत: शाहरुख खानने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे
ऑनलाइन लोकमत -
वॉशिंग्टन, दि. 12 - बॉलिवूड बादशाह शाहरुख खानला अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाने ताब्यात घेतलं आहे. स्वत: शाहरुख खानने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. लॉस एंजेलिस विमानतळावरुन शाहरुख खानला ताब्यात घेण्यात आलं. बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार शाहरुख आपली मुलं सुहाना आणि आर्यनसोबत अमेरिकेसाठी प्रवास करत असताना कारवाई करण्यात आली.
'सुरक्षेसंबंधी मी समजू शकतो आणि त्याचा आदरही करतो, पण अमेरिकेच्या इमिग्रेशनकडून दरवेळी कारवाई करणे त्रासदायक असल्याचं', शाहरुख खानने ट्विटमध्ये म्हटलं आहे. हे सर्व प्रकरण गंभीर वाटत असंल तरी शाहरुख खानने पुढील ट्विटमध्ये आपल्या स्वभावाप्रमाणे विनोद करत 'चांगली बाजू ही की तितक्या वेळेत काही पोकेमॉन पकडले ' असं सांगत प्रकरण शांतपणे हाताळण्याचा प्रयत्न केला आहे.
I fully understand & respect security with the way the world is, but to be detained at US immigration every damn time really really sucks.
— Shah Rukh Khan (@iamsrk) August 12, 2016
The brighter side is while waiting caught some really nice Pokemons.
— Shah Rukh Khan (@iamsrk) August 12, 2016
विशेष म्हणजे अमेरिकेने याअगोदरही शाहरुख खानला अशाप्रकारे ताब्यात घेतलं होतं. 2012 मध्ये न्यूयॉर्क विमानतळावर तब्बल दोन तासांसाठी त्याची चौकशी करण्यात आली होती.
या सर्व प्रकारानंतर अमेरिकेच्या भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांनी शाहरुख खानची माफी मागितली आहे. आणि पुन्हा असं होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं आश्वासन दिलं आहे.
US Ambassador to India, Richard Verma apologises to Shahrukh Khan, says working to ensure it doesn’t happen again.
— ANI (@ANI_news) August 12, 2016