कृष्णवर्णीयांच्या हत्येच्या विरोधात अमेरिकेत मोर्चे

By admin | Published: December 15, 2014 02:59 AM2014-12-15T02:59:06+5:302014-12-15T02:59:06+5:30

नि:शस्त्र कृष्णवर्णीयांच्या पोलिसांकडून होणाऱ्या हत्यांमुळे संपूर्ण अमेरिकेत लोक संतप्त असून, न्यूयॉर्क, बोस्टन व वॉशिंग्टन या शहरात पोलिसांविरोधात निघालेल्या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले.

In the US against the assassination of the blacksmiths | कृष्णवर्णीयांच्या हत्येच्या विरोधात अमेरिकेत मोर्चे

कृष्णवर्णीयांच्या हत्येच्या विरोधात अमेरिकेत मोर्चे

Next

वॉशिंग्टन : नि:शस्त्र कृष्णवर्णीयांच्या पोलिसांकडून होणाऱ्या हत्यांमुळे संपूर्ण अमेरिकेत लोक संतप्त असून, न्यूयॉर्क, बोस्टन व वॉशिंग्टन या शहरात पोलिसांविरोधात निघालेल्या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले.
फर्गसन, मिसुरी, न्यूयॉर्क, क्लीव्हलँड येथे सशस्त्र गौरवर्णीय पोलिसांनी कृष्णवर्णीय पुरुषांची हत्या केली. त्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेले हे मोर्चे शांततेत निघाले. बोस्टनमध्ये महामार्ग अडविणाऱ्या २३ लोकांना अटक करण्यात आली आहे.
मायकेल ब्राऊन हा १८ वर्षीय युवक व एरिक गार्नर हा प्रौढ कृष्णवर्णीय यांची हत्या करणाऱ्या पोलिसांना ग्रँड ज्युरींनी निर्दोष सोडून दिले. त्यामुळे नागरिक संतप्त आहेत. पोलिसांच्या अत्याचाराची प्रकरणे घेण्याची परवानगी सरकारी वकिलांना असावी, अशी मागणी वॉशिंग्टन येथील मोर्चाचे आयोजन करणाऱ्या रेव्ह. अल शर्पटन यांनी केली आहे. मोर्चात सहभागी असणारे बहुतांशजण पालक होते.
आपापल्या मुलांसह ते मोर्चात सहभागी होते. नो जस्टिस, नो पीस, नो रेसिस्ट पोलीस अशा घोषणा मोर्चेकरी देत होते. मोर्चात माणसांचा समुद्र पसरला आहे, हे पाहून जर पोलीस बदलणार नसतील, तर आणखी काय करावे हे मला कळत नाही, असे मायकेल ब्राऊनच्या आईने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: In the US against the assassination of the blacksmiths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.