गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 13:24 IST2024-05-01T13:23:54+5:302024-05-01T13:24:44+5:30
b2 stealth bomber नक्की कसे काम करते? याने इस्रायल-हमास युद्धाची दिशा बदलणार? वाचा सविस्तर

गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
America b2 stealth bomber in Gaza, Israel Hamas War: जगात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्व बड्या राष्ट्रांमध्ये स्पर्धा लागली आहे. पण ही स्पर्धा हळूहळू जगाला विनाशाच्या उंबरठ्यावर घेऊन जात असल्याचे आंतरराष्ट्रीय जाणकार सांगत आहेत. दुसऱ्या महायुद्धापूर्वीही अमेरिका आणि रशियासारख्या देशांनी अनेक बॉम्ब तयार केले होते. त्या बॉम्बमध्ये ठराविक परिसरातील संपूर्ण लोकसंख्येचा नाश करण्याची क्षमता होती. सध्या इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धात अनेक बडे देश दोन्ही देशांना मदत करत आहेत. तशातच बी-२ स्पिरिट स्टील्थ बॉम्बरची चर्चा होत आहे कारण त्याची झलक गाझाजवळ नुकतीच पाहायला मिळाली आहे.
अलीकडे जगात अनेक आघाड्यांवर युद्धे सुरू आहेत. बहुतांश आघाड्यांवर अमेरिका अप्रत्यक्षपणे सहभागी आहे. अमेरिकेकडे हवाई युद्धांसाठी अने अत्यधुनिक शस्त्रास्त्रे आहे, ज्याद्वारे ते जगात कुठेही हल्ला करू शकतात. या अमेरिकन बॉम्बचे नाव B-2 स्पिरिट स्टील्थ बॉम्बर आहे. गाझामध्ये हा बॉम्बर दिसला असला तरी अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण जर ते इस्रायल-हमास युद्धात तैनात केले गेले तर अमेरिकेचे हे अत्यंत शक्तिशाली शस्त्र युद्धाची दिशा पूर्णपणे बदलू शकते.
B-2 स्पिरिट स्टील्थ बॉम्बरमध्ये खास काय?
B-2 स्पिरिट स्टील्थ बॉम्बर जगातील सर्वात धोकादायक बॉम्बर म्हणून ओळखले जाते. हे एक स्टील्थ एअरक्राफ्ट आहे, जे कोणत्याही रडारद्वारे ट्रॅक केले जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याचे लोकेशन ओळखणे आणि थांबवणे फार कठीण आहे. याशिवाय बी-2 स्पिरिट स्टील्थ बॉम्बर एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह उड्डाण करू शकते. त्यामुळे या बॉम्बरमध्ये एखाद्या मोठ्या देशाचा ठराविक परिसर उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे. B-2 स्पिरिट स्टील्थ बॉम्बर हे जगातील सर्वात महागडे एअरक्राफ्ट आहे. ते बनवण्याची किंमत खूप जास्त आहे. अमेरिकेकडेही केवळ 20 बी-2 स्पिरिट स्टील्थ बॉम्बर्स आहेत. हे विमान एकावेळी 23 हजार किलोग्रॅमपर्यंत शस्त्रे वाहून नेऊ शकतात.