लिबियातील इस्लामिक स्टेटच्या तळावर अमेरिकेचे हवाई हल्ले
By Admin | Published: August 2, 2016 01:29 AM2016-08-02T01:29:24+5:302016-08-02T03:21:44+5:30
अमेरिकेच्या या हल्ल्यात इस्लामिक स्टेटचे प्रचंड नुकसान झाले असल्याचा दावा.
ट्रीपोली : लिबियातील इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटाचे वर्चस्व असलेल्या ठिकाणांवर सोमवारी अमेरिकेने हवाई हल्ले केले. अमेरिकेच्या पाठिंबा असलेल्या लिबियातील सरकारने अमेरिकेला विनंती केल्यानंतर हे हल्ले केले असल्याचे पेंटागन सूत्रांनी स्पष्ट केले.
बंदरांचे शहर अशी ओळख असलेल्या सिर्त या शहरावर इस्लामिक स्टेटचे वर्चस्व असल्याचे सांगण्यात येते. या ठिकाणालाच अमेरिकेने लक्ष्य केले. अमेरिकेच्या या हल्ल्यात इस्लामिक स्टेटचे प्रचंड नुकसान झाले असल्याचा दावा लिबियाचे पंतप्रधान फईज सराज यांनी केला. अमेरिकेची या वर्षातील लिबियातील पहिलीच कारवाई असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. यापूर्वी गतवर्षी फेब्रुवारी व नोव्हेंबर महिन्यात अशा प्रकराचे हल्ले करण्यात आले होते.