इराकमध्ये अमेरिकेचं एअर स्ट्राईक; हल्ल्यात १६ नागरिकांचा मृत्यू, इराक सरकार भडकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 06:41 PM2024-02-03T18:41:43+5:302024-02-03T18:42:18+5:30

या आक्रमक हल्ल्यामुळे १६ नागरिकांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक जखमी आहेत. या हल्ल्यामुळे इमारती आणि नागरिकांच्या संपत्तीचेही नुकसान झाले आहे. 

US air strike in Iraq; 16 civilians died in the attack, the Iraqi government was outraged | इराकमध्ये अमेरिकेचं एअर स्ट्राईक; हल्ल्यात १६ नागरिकांचा मृत्यू, इराक सरकार भडकलं

इराकमध्ये अमेरिकेचं एअर स्ट्राईक; हल्ल्यात १६ नागरिकांचा मृत्यू, इराक सरकार भडकलं

इराकमध्ये इराण समर्थित ठिकाणांवर अमेरिकेने एअर स्ट्राईक केली आहे. या हल्ल्यात १६ नागरिकांचा मृत्यू झाला तर २५ हून अधिक जखमी झालेत. या घटनेची माहिती पंतप्रधान मोहम्मद शिया अल सुदानी यांच्या कार्यालयाने दिली. हे हल्ले इराकच्या सार्वभौमत्वाविरुद्धची नवी आक्रमकता म्हणून घेण्यात आले आहेत. या हल्ल्याचा निवेदनात निषेध करण्यात आला असून इराक सरकारसोबत अमेरिकेने आधीच चर्चा केली होती हा दावा फेटाळून लावला आहे. अशाप्रकारच्या बातम्या चुकीच्या असल्याचं इराकनं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 

निवेदनात म्हटलं की, या क्षेत्रात अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी युतीची उपस्थिती "इराकची सुरक्षा, स्थिरता तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय संघर्षांमध्ये इराकचा सहभाग धोक्यात आणते. अमेरिकेच्या अनेक विमानांनी आकाशातून बॉम्बगोळे फेकले. जिथे आमचे सुरक्षा जवान तैनात होते तिथेही हल्ला झाला. त्यासोबत आसपास नागरी रहिवासी ठिकाणेही होती. या आक्रमक हल्ल्यामुळे १६ नागरिकांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक जखमी आहेत. या हल्ल्यामुळे इमारती आणि नागरिकांच्या संपत्तीचेही नुकसान झाले आहे. 

अमेरिकेने जाणुनबुजून हा हल्ला केला असून इराकच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय असल्याचं सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. या हवाई हल्ल्यामुळे इराकमधील सुरक्षा परिस्थिती रसातळाला जाईल आणि त्यामुळे आवश्यक स्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नांना बाधा पोहचली आहे. आंतरराष्ट्रीय संघटनांनी  ज्यांनी आपल्या नियुक्त केलेल्या कामांपासून विचलित केले आहे आणि दिलेला जनादेश इराकमधील सुरक्षा आणि स्थिरता धोक्यात आणण्याचे कारण बनले आहे. यामुळे इराक प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय संघर्षात आहे असं इराकनं जोर देऊन सांगितले आहे. इराक सरकार आमच्या देशातील जमीन, शहरे आणि सैन्यात काम करणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहोत.

Web Title: US air strike in Iraq; 16 civilians died in the attack, the Iraqi government was outraged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.