अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 02:18 PM2024-09-30T14:18:09+5:302024-09-30T14:21:23+5:30

US Air Strike Attack on Syria: अमेरिकन सैन्याने सांगितले की त्यांनी दोन वेगवेगळ्या दिवशी सीरियामध्ये हल्ले केले.

US America air strike on Syria ISIS training center al Qaeda 37 terrorists killed | अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा

अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा

US Air Strike Attack on Syria: सीरियातील ISIS आणि अल कायदाशी संबंधित दहशतवादी गटांच्या लक्ष्यांवर अमेरिकेने हल्ला केला. यामध्ये ३७ दहशतवादी मारले गेले आहेत. अमेरिकन सैन्याने सांगितले की त्यांनी दोन वेगवेगळ्या दिवशी सीरियामध्ये हल्ले केले. यूएस सेंट्रल कमांडच्या म्हणण्यानुसार, १६ सप्टेंबर रोजी मध्य सीरियामध्ये ISIS च्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला करण्यात आला. यामध्ये २८ दहशतवादी मारले गेले. यानंतर २४ सप्टेंबर रोजी अमेरिकन लष्कराने उत्तर-पश्चिम सीरियावर हल्ला केला, ज्यामध्ये अल कायदा गटाचे ९ दहशतवादी मारले गेले. अमेरिकेने केलेल्या दोन हल्ल्यात अल कायदा संघटनेशी संबंधित हुर्रास अल-दिनचा टॉप कमांडर 'अब्द-अल-रौफ' मारला गेला आहे, अशी माहिती अमेरिकन लष्कराने दिली आहे. त्याने सीरियातील लष्करी कारवायांवर देखरेख ठेवली होती.

सीरिया हा मुस्लिमबहुल देश असून, ७४% सुन्नी आणि १०% शिया लोकसंख्या आहे. 'व्हॉईस ऑफ अमेरिका'च्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी १९६६ मध्ये सीरियात सत्तापालट झाला होता. त्यावेळी सीरियन हवाई दलाचा कमांडर हाफिज असद याचाही यात सहभाग होता. सत्तापालटानंतर हाफिजला सीरियाचे संरक्षण मंत्री करण्यात आले होते. चार वर्षांनंतर १९७० मध्ये, हाफेज असदने दुसर्या सत्तापालटाचे नेतृत्व केले आणि अध्यक्ष सलाह हदीदची जागा घेतली. हाफिज असदने बाथ पार्टी वगळता इतर सर्व पक्षांना संपवले. त्याने आपल्या विरोधकांना मारले आणि निवडकपणे शिया लोकांना सत्तेवर बसवले.

मिडल ईस्ट आयच्या रिपोर्टनुसार, हाफिज असदने रशियाशी चांगले संबंध निर्माण केले. हाफिजने १९८१ मध्ये इराकविरुद्धच्या युद्धात इराणला पाठिंबा दिला आणि इराणशी चांगले संबंध प्रस्थापित केले. हाफिज असद यांचे २००० मध्ये निधन झाले, त्यानंतर त्यांची जागा त्यांचा मुलगा बशर अल-असद यांनी घेतली. २०११ मध्ये अरब देशांमध्ये सरकारविरोधी लाट सुरू झाली. मार्च २०११ मध्ये ते सीरियात पोहोचले. बहुसंख्य सुन्नी जनतेने बशर अल-असाद यांना सत्तेवरून हटवण्यासाठी निदर्शने सुरू केली. बशर अल-असद यांनी सुरक्षा दलांना शांततापूर्ण निदर्शने दडपण्याचे आदेश दिले, परंतु निदर्शने थांबली नाहीत. आता अमेरिकेने सिरियावर हल्ला केल्याने काही समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: US America air strike on Syria ISIS training center al Qaeda 37 terrorists killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.