हुथी बंडखोरांवर पुन्हा एकदा 'एअर स्ट्राईक'; अमेरिका ब्रिटनने संयुक्तपणे केला बॉम्बहल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 08:25 AM2024-01-23T08:25:14+5:302024-01-23T08:27:12+5:30
Red Sea Houthi Attack: व्यापाराच्या प्रवाहाचे रक्षण करताना कोणाचीही गय करणार नसल्याचा दिला इशारा
Red Sea Houthi Attack by US UK: अमेरिका आणि ब्रिटनने लाल समुद्रात पुन्हा एकदा हुथी बंडखोरांवर कारवाई केली आहे. दोन्ही देशांनी येमेनमधील हुथींच्या तळांवर संयुक्त हवाई हल्ले केले आहेत. पेंटागॉनने सांगितले की, सोमवारी आठ तळांवर हल्ले करण्यात आले. यामध्ये, अंडरग्राउंड स्टोरेज साइट आणि हुथींची मिसाइलवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीवर परिणाम करण्यात आला. इराणचे समर्थन असलेले हुथी बंडखोर इस्रायल किंवा पश्चिमेशी जोडलेल्या जहाजांना लक्ष्य करत आहेत. लाल समुद्र हा एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे. त्यामुळे हुथींचे तळ उद्ध्वस्त करण्याने व्यापाराच्या मुक्त प्रवाहाचे रक्षण केले जात आहे, असे अमेरिका व युकेकडून सांगण्यात आले.
पेंटागॉनने जारी केलेल्या संयुक्त निवेदनाने हुथींविरुद्ध हल्ल्यांची पुष्टी केली गेली. "सामरिक तणाव कमी करणे आणि लाल समुद्रातील परिस्थिती पूर्ववत करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, परंतु यात आम्ही हुथींना चेतावणी देतो की त्यांनी हल्ले थांबवावे," असे निवेदनात म्हटले आहे. वाढत्या धोक्यांमध्ये, जगातील सर्वात मोठ्या व्यापाराच्या मुक्त प्रवाहाचे रक्षण करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही. हुथींच्या तळांवर अमेरिकेचा हा आठवा हल्ला आहे. यापूर्वी ११ जानेवारी रोजी झालेल्या संयुक्त हल्ल्यानंतर ब्रिटनसोबतची ही दुसरी संयुक्त कारवाई आहे.
मुस्लीम देशाकडून कारवाईला पाठिंबा
निवेदनानुसार या हल्ल्याला ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि नेदरलँड्सकडूनही पाठिंबा मिळाला होता. मुस्लिम देश बहारीननेही पाठिंबा दिला. सोमवारच्या हल्ल्यांमध्ये यूएसएस आयझेनहॉवर या विमानवाहू युद्धनौकेच्या अमेरिकन लढाऊ विमानांचा समावेश होता. यूके संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, चार आरएएफ टायफून, ज्यांना व्हॉयेजर टँकरच्या जोडीने पाठबळ मिळाले. ते यूएस सैन्यासोबत राहिले. या विमानांनी पेवेवे IV च्या बॉम्बने साना एअरफील्डच्या आसपासच्या दोन लष्करी तळांवर हल्ला केला. या तळावरून लाल समुद्रातील आंतरराष्ट्रीय शिपिंगच्या विरोधात सतत कारवाया सुरू होत्या, असा दावाही त्यांनी