चीनला उघड ठसन! अमेरिका तैवानला तब्बल १ अब्ज डॉलरची शस्त्रास्त्र देणार, संरक्षण विभागाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 12:50 PM2022-09-03T12:50:38+5:302022-09-03T12:51:41+5:30

चीन आणि तैवानमधील वाढत्या तणावात आता आणखी भर पडली आहे. अमेरिका तैवानला तब्बल १.१ बिलियल डॉलर किमतीची शस्त्रास्त्र विकणार आहे.

us approves potential 11 billion dollors arms sale to taiwan amid china tensions | चीनला उघड ठसन! अमेरिका तैवानला तब्बल १ अब्ज डॉलरची शस्त्रास्त्र देणार, संरक्षण विभागाची मंजुरी

चीनला उघड ठसन! अमेरिका तैवानला तब्बल १ अब्ज डॉलरची शस्त्रास्त्र देणार, संरक्षण विभागाची मंजुरी

googlenewsNext

नवी दिल्ली-

चीन आणि तैवानमधील वाढत्या तणावात आता आणखी भर पडली आहे. अमेरिका तैवानला तब्बल १.१ बिलियल डॉलर किमतीची शस्त्रास्त्र विकणार आहे. यासाठीची मंजुरी अमेरिकेच्या संरक्षण विभागानं दिली आहे. अमेरिकन संरक्षण विभागनं दिलेल्या माहितीनुसार शस्त्रांमध्ये ६० अँटी-शिप मिसाइल आणि १०० एअर-टू-एअर मिसाइलचा समावेश असणार आहे. अमेरिकेनं या पॅकेजची घोषणा गेल्या महिन्यात अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेच्या अध्यक्षा नॅन्सी यांच्या तैवान दोऱ्यानंतर चीनच्या आक्रमक पावित्र्याच्या पार्श्वभूमीवर केली होती. 

पेंटागॉनच्या सुरक्षा सल्लागार एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेकडून तैवानला देण्यात येणाऱ्या शस्त्रांमध्ये साइडविंडर मिसाइल्सचा देखील समावेश आहे. याचा वापर हवेतून जमिनीवर केल्या जाणाऱ्या माऱ्यासाठी होतो. अमेरिकन सीनेटच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी तैवान दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड झाला आहे. चीननं तैवानच्या आजूबाजूला थेट युद्धअभ्यास सुरू केला होता. तैवाननं याचा मोठ्या प्रमाणात विरोध केला. तैवानच्या राष्ट्रपती साई इंग वेन यांनीही चीनचा स्पष्ट शब्दांत निषेध व्यक्त केला होता. यातच आता अमेरिकेकडून तैवानला मोठी मदत मिळत आहे. 

चीनच्या सैन्य अभ्यासाला प्रत्युत्तर देत तैवाननंही आमच्या हद्दीत आगळीक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असं रोखठोक सांगण्यात आलं आहे. अमेरिकन स्पीकरच्या तैवान दौर्यामुळे चीन आणि तैवानमधील वाद विकोपाला पोहोचल्याचं म्हटलं जात आहे. 

तैवान आणि चीनबाबत अमेरिकेची रणनिती काय?
तैवान हा आपलाच प्रांत असल्याची चीनची भूमिका आहे. तर तैवान स्वत:ला स्वतंत्र देश मानतो. दुसरीकडे अमेरिकेचे तैवानसोबत अधिकृतरित्या कोणतेही राजनैतिक संबंध नाहीत. चीनच्या वन पॉलिसीचं समर्थन तैवान करत आला आहे. पण अमेरिका-तैवान रिलेशन अॅक्ट अंतर्गत तैवानला शस्त्रास्त्र विक्री अमेरिका करत आला आहे. या कायद्यात अमेरिका तैवानला आत्मरक्षणासाठी मदत करेल असं नमूद आहे. यातच नॅन्सी पेलोसी यांचा तैवान दौरा चीनच्या पॉलिसीचं उल्लंघन असल्याची भूमिका चीननं घेतली होती. तरीही नॅन्सी यांनी तैवानचा दौरा केला. त्यावर संतप्त झालेल्या चीननं हा दौरा आम्हाला शस्त्र हाती घेण्यास भाग पाडणारा आहे अशी उघड धमकीच दिली होती. 

चीननं थेट अमेरिकेलाही दिली धमकी
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यावरुन अमेरिकेला धमकी देताना अमेरिकेचं हे पाऊल म्हणजे आगीशी खेळण्याचा प्रकार आहे, असं म्हटलं होतं. याचे परिणाम खूप वाईट होतील. जे आगीशी खेळतील ते स्वत:च आपले हात आगीत पोळून घेतील, असा कडक इशारा चीननं अमेरिकेला दिला होता. इतकंच नव्हे, तर पेलोसी यांचा दौरा पाहून चीननं तैवान भोवती थेट युद्धाभ्यास सुरू केला होता. दुसरीकडे तैवाननंही युद्धजन्य परिस्थितीला तोंड देण्यासाठीची तात्काळ तयारी सुरू केली होती. आता तैवानला उघडपणे अमेरिकेकडून मदत केली जात आहे. त्यामुळे तैवान देखील चीनला आता उघडपणे कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी देश सज्ज असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नव्हे, तर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी चीननं जर तैवानवर हल्ला केला तर अमेरिका तैवानचं रक्षण करेल असं विधान केलं होतं. 

Web Title: us approves potential 11 billion dollors arms sale to taiwan amid china tensions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.