US Corona Booster Dose: अमेरिकेचा मोठा निर्णय! १८ वर्ष व त्यावरील सर्वांना कोरोना विरोधी बुस्टर डोस घेण्यास दिली मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 09:15 PM2021-11-19T21:15:17+5:302021-11-19T21:15:43+5:30

US Corona Booster Dose: कोरोना महामारीपासून नागरिकांना अधिक सुरक्षित करण्यासाठी अमेरिकेनं शुक्रवारी मोठा निर्णय जाहीर केला आहे.

US authorizes Covid boosters for all over 18 years Pfizer Moderna | US Corona Booster Dose: अमेरिकेचा मोठा निर्णय! १८ वर्ष व त्यावरील सर्वांना कोरोना विरोधी बुस्टर डोस घेण्यास दिली मान्यता

US Corona Booster Dose: अमेरिकेचा मोठा निर्णय! १८ वर्ष व त्यावरील सर्वांना कोरोना विरोधी बुस्टर डोस घेण्यास दिली मान्यता

Next

US Corona Booster Dose: कोरोना महामारीपासून नागरिकांना अधिक सुरक्षित करण्यासाठी अमेरिकेनं शुक्रवारी मोठा निर्णय जाहीर केला आहे. १८ वर्ष व त्यावरील सर्व वयोगटातील नागरिकांसाठीच्या कोरोना विरोधी बुस्टर डोसला मान्यता दिली आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनानं (FDA) याबाबतची माहिती दिली आहे. एफडीएनं फायझर आणि मॉडर्नाच्या लसीच्या तिसऱ्या डोसच्या वापराला आपत्कालीन मंजुरी दिली आहे. 

सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार मॉडर्ना आणि फायझरच्या लसीचा बुस्टर डोसच्या पात्रतेचा विस्तार १८ वर्ष व त्यावरील वयाच्या नागरिकांसाठी प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं आहे असं एफडीए सेंटर फॉर बायोलॉजिक्स इव्हॅल्यूएशन अँड रिसर्चचे संचालक पीटर मार्क्स यांनी सांगितलं आहे.  

अमेरिकेत ज्या ज्या व्यक्तींना बुस्टर डोस देण्याची गरज आणि पात्रता आहे अशांना डोस उपलब्ध होईल याची काळजी घेतली जावी असंही एफडीएकडून सांगण्यात आलं आहे. ज्यांनी फायझर आणि मॉडर्नाची लस घेतली आहे असे नागरिक आपल्या दुसऱ्या डोस घेतल्याच्या सहा महिन्यांनंतर बुस्टर डोससाठी पात्र ठरतील असंही एफडीएकडून सांगण्यात आलं आहे. तर ज्यांनी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची लस घेतली आहे असे लोक पहिल्या डोसच्या दोन महिन्यानंतर बुस्टर डोससाठी पात्र ठरणार आहेत. 

फायझर आणि मॉडर्ना लसीचा अतिरिक्त डोस रोग प्रतिकारक शक्ती वाढवत असल्याचा डेटा समोर आला आहे. फायझर आणि मॉडर्नानं सप्टेंबर महिन्यातच बुस्टर डोस दिला जावा यासाठीची परवानगी मागितली होती. पण एफडीएकडून याबाबत सावध भूमिका घेण्यात आली होती. 

Web Title: US authorizes Covid boosters for all over 18 years Pfizer Moderna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.