चीनला अमेरिकेचा झटका, शी जिनपींग यांना 'राष्ट्रपती' न मानणारा कायदा संसदेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 09:10 AM2020-08-23T09:10:30+5:302020-08-23T09:10:45+5:30

वॉशिंग्टनमधील संसदेत संघीय सरकारद्वारे चीनच्या प्रमुख नेत्याचा उल्लेख करण्याच्या प्रकारात बदलण्याचे विधेयक मांडले आहे. त्यानुसार, राष्ट्रपती या शब्दाला आक्षेप घेण्यात आला आहे.

US blow to China, law not to consider Xi Jinping as 'President' in Parliament | चीनला अमेरिकेचा झटका, शी जिनपींग यांना 'राष्ट्रपती' न मानणारा कायदा संसदेत

चीनला अमेरिकेचा झटका, शी जिनपींग यांना 'राष्ट्रपती' न मानणारा कायदा संसदेत

googlenewsNext
ठळक मुद्देवॉशिंग्टनमधील संसदेत संघीय सरकारद्वारे चीनच्या प्रमुख नेत्याचा उल्लेख करण्याच्या प्रकारात बदलण्याचे विधेयक मांडले आहे. त्यानुसार, राष्ट्रपती या शब्दाला आक्षेप घेण्यात आला आहे.

वाशिंग्टन - चीन आणि अमेरिकेच्या संबंधात चांगलाच बिघाड झाल्याचं पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच चीनने चीन कंपनी असलेल्या टीकटॉकवर बंदी घातली होती. तर, चीने राष्ट्रपती शी जिनपींग यांच्यासमवेतही खटके उडाल्याचं दिसून आलं आहे. आता, अमेरिका सरकार शी जिनपींग यांना चीने राष्ट्रपती मानणार नाही. शत्रु अधिनियम अंतर्गत लवकरच अमेरिका सरकारच्या कुठल्याही दस्तावेजमध्ये जिनपींग यांचा नामोल्लेख राष्ट्रपती नसणार आहे. 

वॉशिंग्टनमधील संसदेत संघीय सरकारद्वारे चीनच्या प्रमुख नेत्याचा उल्लेख करण्याच्या प्रकारात बदलण्याचे विधेयक मांडले आहे. त्यानुसार, राष्ट्रपती या शब्दाला आक्षेप घेण्यात आला आहे. चीनच्या प्रमुख नेत्याला राष्ट्रपती न संबोधण्याचे या विधेयकात म्हटले आहे. चीनी कम्युनिष्ट पक्षात भूमिकेनुसार चीनच्या प्रमुख नेत्याचा संदर्भ दिला पाहिजे. सद्यस्थितीत चीनचे प्रमुख नेते शी जिनपींग यांच्यासाठी 3 अधिकारीक पदांचा उल्लेख होतो. त्यामध्ये, कुठेही राष्ट्रपती असे पद किंवा उल्लेख नाही. 

जिनपींग यांना प्रमुख नेते, केंद्रीय सैन्य आयोगाचे अध्यक्ष आणि कम्युनिष्ट पक्षाचे महासचिव असा संदर्भ आहे. मात्र, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह इतरही इंग्रजी बोलणाऱ्या देशांचे प्रमुख त्यांचा उल्लेख राष्ट्रपती असाच करतात. त्यामुळे, जनतेतून निवडूण येणाऱ्या नेत्यासच राष्ट्रपती म्हटले जावे, राष्ट्रपती शब्दाचा अर्थच जनतेतून निवडूण आलेल्या नेत्यांसाठी केला जातो, असे टीकाकारांचे म्हणणे आहे. एका प्रमुख नेत्यास राष्ट्रपती संबोधणे म्हणजे निवडूण येणाऱ्या नेत्यांस अनुचित वैधता असल्याचे दर्शवते, असेही त्यांना वाटते. 

अमेरिकेच्या संसदेतील अधिनिमयांत म्हटले आहे की, चीनच्या प्रमुख नेत्यास राष्ट्रपती म्हणणे म्हणजे आपल्या देशातील नागरिकांनी त्यांची लोकशाही मार्गाने निवड केली आहे, अशी धारणा बनते. या विधेयकास रिपल्बिक पक्षाचे खासदार स्कॉट पेरी यांनी मांडले आहे. 
 

Web Title: US blow to China, law not to consider Xi Jinping as 'President' in Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.