अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा; हजारो विमान उड्डाणे रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 01:37 AM2018-01-06T01:37:54+5:302018-01-06T01:38:09+5:30
अमेरिकेच्या पूर्व भागाला हिमवादळाने जोरदार तडाखा दिला असून, संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. न्यूयॉर्क शहरावर पूर्णपणे बर्फाची चादर पसरली गेली आहे. न्यूयॉर्कचे जॉन एफ केनडी आंतरराष्ट्रीय विमानतळही काही काळासाठी बंद करावे लागले आहे.

- न्यूयॉर्कच्या जेएफके आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे जगातील सर्वांत मोठे प्रवासी विमानही स्टेवर्ट येथील एका छोट्या विमानतळावर आपत्कालीन स्थितीत उतरवावे लागले. यातील ३२५ प्रवासी सुखरूप आहेत.
- 5000 विमानांचे उड्डाण संपूर्ण अमेरिकेत रद्द करावे लागले असल्याचे फ्लाइटवेअर नावाच्या संकेतस्थळावर म्हटले आहे.
- 08इंच बर्फाचे थर अमेरिकेच्या पूर्व भागातील अनेक शहरांमध्ये साठलेले आहेत. त्यामुळे सर्व प्रकारची वाहतूक विस्कळीत झाली आहे. - 17 जणांचा आतापर्यंत या बर्फवृष्टीने बळी गेला आहे.