US Capitol: जमावाचा धुडगूस सुरू असताना 'त्याने' थाटला फ्राईजचा स्टॉल, फोटो व्हायरल

By स्वदेश घाणेकर | Published: January 7, 2021 01:47 PM2021-01-07T13:47:23+5:302021-01-07T13:49:06+5:30

WashingtonDC आतापर्यंत ५२ आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. पण, या सर्व प्रकारात एकानं अमेरिकेच्या  संसदेबाहेर फ्राईजचा स्टॉट थाटल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

US Capitol: Someone started selling chicken and fries during protest at US Capitol, Photo viral | US Capitol: जमावाचा धुडगूस सुरू असताना 'त्याने' थाटला फ्राईजचा स्टॉल, फोटो व्हायरल

US Capitol: जमावाचा धुडगूस सुरू असताना 'त्याने' थाटला फ्राईजचा स्टॉल, फोटो व्हायरल

Next

अमेरिकेच्या अध्यक्षीय ( President) निवडणुकीच्या निकालावरून अजूनही राजकीय पेच सुरूच आहे. २०२० झालेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांचा पराभव झाला. पण, अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप करत दबाव आणला जात होता. यात डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी (Donald Trump supporters) व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डिंगबाहेर जमावानं धुडगूस घातला. त्यामुळे वॉशिंग्टन डीसीमध्ये (  WashingtonDC) संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत ५२ आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. पण, या सर्व प्रकारात एकानं अमेरिकेच्या  संसदेबाहेर फ्राईजचा स्टॉट थाटल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. ( Someone started selling fries during protest at US Capitol) 


नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले जो बायडेन (Joe Biden) यांनी  ट्रम्प यांना संविधानाची सुरक्षा करण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर, कॅपिटल बिल्डिंगमध्ये जो गोंधळ आपण पाहिला आहे, ते आम्ही नाही आहोत. ही कायदा न मानणाऱ्या लोकांची खूप कमी संख्या आहे. हा देशद्रोह आहे, असे जो बायडेन यांनी सांगितले. या सर्व तणावाच्या वातावरणात फ्राईजचा स्टॉलही चर्चेत आला आहे. नॉरबर्ट एलेकेस यांनी हा फोटो ट्विट केला आहे. त्यांच्या या ट्विटला १६ हजाराहून अधिक लाईक्स, चार हजाराहून अधिक रिट्विट मिळाले आहेत. 



ट्रम्प यांचे समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना शांततेचे आवाहन केले आहे. आपल्या समर्थकांना शांततेत निषेध करण्याचे आवाहन करीत ट्रम्प म्हणाले की, आंदोलनात कोणतीही हिंसाचार होऊ नये. लक्षात ठेवा आम्ही कायदा व सुव्यवस्थेचा पक्षात आहोत.

फेसबुकने हटविला ट्रम्प यांचा व्हिडीओ
ट्विटरनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडिओ फेसबुकने डिलीट केला. दरम्यान, अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या वेळी ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले होते. "आम्ही ट्रम्प यांचा व्हिडिओ हटविला आहे, कारण ट्रम्प यांचा व्हिडिओ सुरु असलेल्या हिंसाचार कमी करण्याऐवजी प्रोत्साहन देत होता," असे फेसबुकचे व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंटीग्रिटी गाय रोसेन यांनी म्हटले आहे.

Web Title: US Capitol: Someone started selling chicken and fries during protest at US Capitol, Photo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.