अमेरिकी नागरिकांना सतर्कतेचा इशारा
By admin | Published: November 25, 2015 12:08 AM2015-11-25T00:08:28+5:302015-11-25T00:08:28+5:30
सार्वजनिक ठिकाणी वावरताना आणि गर्दीच्या भागात तसेच प्रवासात सावध राहण्याच्या सूचना अमेरिकेतील नागरिकांना सरकारने दिल्या आहेत.
Next
वॉशिंग्टन : सार्वजनिक ठिकाणी वावरताना आणि गर्दीच्या भागात तसेच प्रवासात सावध राहण्याच्या सूचना अमेरिकेतील नागरिकांना सरकारने दिल्या आहेत. विशेषत: फेब्रुवारीपर्यंत अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विदेश मंत्रालयाने जारी केलेल्या या संदेशात म्हटले आहे की, इसिस,अल-कायदा, बोको हराम आणि अन्य अतिरेकी संघटना काही भागात अतिरेकी हल्ले करण्याचे षड्यंत्र आखत आहेत. या हल्ल्यात विशेष प्रकारची रणनीती आणि परंपरागत तसेच अन्य हत्यारांचा उपयोग होऊ शकतो. (वृत्तसंस्था)