‘इसिस’विरुद्ध अमेरिकेला हवे रशियाचे सहकार्य
By admin | Published: September 17, 2015 01:05 AM2015-09-17T01:05:38+5:302015-09-17T01:05:38+5:30
सिरिया लष्कर तैनात करण्यापेक्षा रशियाने ‘इसिस’ या अतिरेकी संघटनेचा बीमोड करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला मदत करावी, असे आवाहन अमेरिकेने
वॉशिंग्टन : सिरिया लष्कर तैनात करण्यापेक्षा रशियाने ‘इसिस’ या अतिरेकी संघटनेचा बीमोड करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला मदत करावी, असे आवाहन अमेरिकेने रशियाला केले आहे. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जोश अर्नेस्ट म्हणाले की, या मुद्यावर अध्यक्ष बराक ओबामा यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी अद्याप चर्चा केलेली नाही; पण असे झालेच तर तेथे आम्हाला मोठीच मदत मिळेल.
सिरियात रशिया आपले रणगाडे आणि लष्कर तैनात करीत असल्याचा आरोप दोन दिवसांपूर्वी अमेरिकेने केला होता. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने रशियाची मदत
मागितली आहे. सिरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांनी पाश्चिमात्य देशांच्या दडपणाखाली पद सोडण्यास नकार दिला आहे. देशाच्या जनतेने तसा निर्णय दिल्यानंतरच आपण पद सोडू, असे त्यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)