ग्रँड ज्युरीच्या भेदभावपूर्ण निकालाने अमेरिकेत असंतोष; न्यूयॉर्क झाले ठप्प

By admin | Published: December 6, 2014 11:42 PM2014-12-06T23:42:51+5:302014-12-06T23:42:51+5:30

ग्रँड ज्युरीने आणखी एका नि:शस्त्र कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी गौरवर्णीय पोलीस अधिका:याविरुद्ध खटला दाखल करण्यास नकार दिल्याने अमेरिकेत मोठा असंतोष उसळला आहे.

US dissatisfaction with discrimination in Grand Jury; New York became stunned | ग्रँड ज्युरीच्या भेदभावपूर्ण निकालाने अमेरिकेत असंतोष; न्यूयॉर्क झाले ठप्प

ग्रँड ज्युरीच्या भेदभावपूर्ण निकालाने अमेरिकेत असंतोष; न्यूयॉर्क झाले ठप्प

Next
कृष्णवर्णीयाची हत्या : गौरवर्णीय पोलिसाविरुद्ध खटला भरण्यास नकार, राष्ट्राध्यक्षांकडूनही निकालावर प्रश्नचिन्ह, लोक रस्त्यावर उतरल्याने वाहतूक विस्कळीत 
न्यूयॉर्क : ग्रँड ज्युरीने आणखी एका नि:शस्त्र कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी गौरवर्णीय पोलीस अधिका:याविरुद्ध खटला दाखल करण्यास नकार दिल्याने अमेरिकेत मोठा असंतोष उसळला आहे. या भेदभावपूर्ण निकालाने संतप्त झालेल्या शेकडोंच्या जमावाने न्यूयॉर्कच्या रस्त्यावर उतरून आंदोलन केले. दरम्यान, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही ग्रँड ज्युरींच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करीत न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
शवविच्छेदन अहवालानुसार, पोलीस अधिका:याने एरिक गार्नर (43) यांचा कोठडीत गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  न्यूयॉर्कचे पोलीस आयुक्त बिल ब्रॅटन यांनी सांगितले की, या प्रकरणी पोलिसांनी कमीत कमी 3क् जणांना ताब्यात घेतले आहे. 
शेकडो आंदोलनकत्र्यानी रॉकफेलर सेंटर व टाइम्स स्क्वेअर येथे एकत्र येऊन प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध घोषणा दिल्या. आंदोलनामुळे न्यूयॉर्क शहरातील वाहतूक अनेक तास ठप्प झाली होती. न्यूयॉर्कसह वॉशिंग्टन, ओक्लाहामा आणि कॅलिफोर्निया येथेही ज्युरीच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन झाले.
दरम्यान, गेल्या दोन आठवडय़ातील हे दुसरे प्रकरण आहे, ज्यात कृष्णवर्णीय नागरिकाच्या हत्येला जबाबदार असलेल्या गौरवर्णीय अधिका:यांवर खटला चालविण्यास ग्रँड ज्युरीने नकार दिला आहे. याआधी 9 ऑगस्ट रोजी फर्गसन येथे कृष्णवर्णीय युवक मायकल ब्राऊन हत्याकांडात पोलीस अधिकारी डॅरेन विल्सन याच्याविरुद्ध खटला दाखल करण्यास ज्युरींनी नकार दिला होता. यानंतर अमेरिकेच्या अनेक भागांत हिंसाचाराचा आगडोंब उसळला होता. हे प्रकरण शमत नाही तोवर या प्रकरणास नवे वळण मिळाले आहे. 
ओबामाही नाराज
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही ग्रँड ज्युरींच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. ग्रँड ज्युरींच्या वतीने पुन्हा एकदा देशातील अल्पसंख्याक कृष्णवर्णीय समाजाच्या भावना दुखावणारा निर्णय आला आहे. ही खूप गंभीर बाब आहे. यावरून न्यायव्यवस्थेचे संरक्षकच आपली जबाबदारी, कर्तव्य योग्य त:हेने पार पाडत नसल्याचे दिसून येते, अशा शब्दांत ओबामा यांनी आपली नाराजी व्यक्त केली. राष्ट्राध्यक्षपदी बराक ओबामा यांची दुस:यांदा वर्णी लागूनही आपल्यासोबतच्या भेदभावात घट झाली नसल्याची भावना कृष्णवर्णीय समाजात निर्माण झाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
जुलै महिन्यातील एका व्हिडिओतील दृश्यानुसार, डॅनिअल पेंटालेओ हा पोलीस अधिकारी एरिक गार्नर यांना ताब्यात घेतो. अस्थमाग्रस्त गार्नर मोठमोठय़ाने मला श्वास घेता येत नाही, असे ओरडताना दिसतात. गार्नर यांना कथितरित्या करचुकवेगिरी करून सिगारेट विक्री केल्यावरून अटक करण्यात आली होती.
माणुसकीच शिल्लक नाही
गार्नर यांची मुलगी एरिकाने सांगितले की, न्यायालयातील लोक मनुष्य नाहीत, त्यांच्यात माणुसकीच शिल्लक राहिली नाही. न्यूयॉर्कचे महापौर बिल डे ब्लेसिओ यांनी सांगितले की, ज्युरींचा निर्णय अनेकांना आवडला नाही. पोलीस-समाज यातील संबंध आणि नागरी हक्क हा केवळ कृष्णवर्णीय, तरुण वा ज्यांच्याविरुद्ध पोलीस कारवाई करीत होते त्यांच्यासाठीचाच प्रश्न नाही, तर ही संपूर्ण अमेरिकेची समस्या आहे. प्रश्न न्यायाचा आहे. (वृत्तसंस्था)
 
4पोलिसांच्या गोळीबारात एका कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांविरुद्ध खटला दाखल करण्याबाबत विचार केला जाणार असल्याचे न्यूयॉर्कच्या जिल्हा न्यायाधीशांनी सांगितले.
4एका मुलीचे पिता असलेले अकाई गर्ली (28) हे गेल्या 2क् नोव्हेंबर रोजी आपल्या प्रेमिकेसोबत जात असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. यात त्यांचा मृत्यू झाला. ब्रुकलीन येथील एका अपार्टमेंटनजीक फिरत असताना गर्ली यांच्यावर पोलिसांचा गोळीबार झाला होता. 
4दरम्यान, कृष्णवर्णीय व्यक्तींच्या हत्येस जबाबदार गौरवर्णीय पोलीस अधिका:यांवर खटला भरण्यास ग्रँड ज्युरींनी अनेक प्रकरणांत नकार दिला आहे. या पाश्र्वभूमीवर न्यूयॉर्कच्या जिल्हा न्यायाधीशांच्या या विधानास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

Web Title: US dissatisfaction with discrimination in Grand Jury; New York became stunned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.