इकडं संपूर्ण जगात टॅरिफचं टेन्शन, तिकडं ट्रम्प म्हणाले, "मला माझ्या सुंदर केसांची..."; घेतला असा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 12:55 IST2025-04-10T12:54:35+5:302025-04-10T12:55:17+5:30
ऑर्डवर स्वाक्षरी करताना ट्रम्प गमतीत म्हणाले, माझ्या बाबतीत, मला माझ्या सुंदर केसांची निगा राखण्यासाठी चांगले शॉवर हवे आहे. पण मला 15 मिनिटे उभे रहावे लागते. तेव्हा कुठे केस ओले होतात. हे हास्यास्पद आहे...

इकडं संपूर्ण जगात टॅरिफचं टेन्शन, तिकडं ट्रम्प म्हणाले, "मला माझ्या सुंदर केसांची..."; घेतला असा निर्णय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील, हे कुणीही सांगू शकत नाही. सध्या एकीकडे अमेरिकेसह संपूर्ण जगात टॅरिफसंदर्भात मोठा गोंधळ उडाला आहे. एक प्रकारचे ग्लोबल ट्रेड वॉर सुरू झाले आहे. यामुळे संपूर्ण जग टेन्शनमध्ये आले आहे. तर दुसरीकडे बुधवारी ट्रम्प यांनी नळाच्या पाण्यासंदर्भातील एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरीही केली. यात, अधिकृतपणे शॉवर, सिंक आणि टॉयलेट सारख्या घरगुती गोष्टींसाठी जुने जलसंधारण नियम शिथिल करण्यात आले असल्याचे, म्हणण्यात आले आहे. मात्र, ट्रम्प यांनी हे आपल्या पद्धतीने सांगिते आहे.
"मला 15 मिनिट उभं रहावं लागतं" -
खरे तर, डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा तक्रार केली आहे की, अमेरिकेत शॉवर आणि टॉयलेटमध्ये पाण्याचे प्रेशर कमी असते. यामुळे अंघोळ आणि केस धुणेही कठीण होते. ऑर्डवर स्वाक्षरी करताना ते गमतीत म्हणाले, माझ्या बाबतीत, मला माझ्या सुंदर केसांची निगा राखण्यासाठी चांगले शॉवर हवे आहे. पण मला 15 मिनिटे उभे रहावे लागते. तेव्हा कुठे केस ओले होतात. हे हास्यास्पद आहे.
ट्रम्प यांनी यापूर्वीही घेतले आहेत असे निर्णय -
व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, " या निर्णयाच्या माध्यमाने ट्रम्प यांनी शॉवरचे स्वातंत्र्य देत आहेत. ओबामा-बायडन यांच्या काळात तयार करण्यात आलेले नियम संपुष्टात आणून सर्वसामान्य अमेरिकीन नागरिकांना दिलासा देत आहेत. ही ऑर्डर टॉयलेट आणि सिंक सारख्या अनेक गोष्टींवर लागू असेल. यापूर्वीही ट्रम्प यांनी बल्ब आणि डिशवॉशरसारख्या उपकरणांसंदर्भातील नियमही शिथील केले होते. यात नंतर ज्यो बायडेन सरकारने बदलही केले होते.