भारतामध्ये लसीचे उत्पादन करण्यास अमेरिका उत्सुक, जॉन्सन अँड जॉन्सनसाठी गुंतवणूक करण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 08:48 AM2021-05-13T08:48:30+5:302021-05-13T08:48:36+5:30

माध्यम प्रतिनिधींशी बोलताना स्मिथ यांनी सांगितले की, भारतातील कोविड स्थितीची अमेरिकेला चिंता वाटते. चिंता वाटण्यामागे केवळ मानवता हे कारण नाही.

US eager to produce vaccines in India, ready to invest for Johnson & Johnson | भारतामध्ये लसीचे उत्पादन करण्यास अमेरिका उत्सुक, जॉन्सन अँड जॉन्सनसाठी गुंतवणूक करण्याची तयारी

भारतामध्ये लसीचे उत्पादन करण्यास अमेरिका उत्सुक, जॉन्सन अँड जॉन्सनसाठी गुंतवणूक करण्याची तयारी

googlenewsNext

नवी दिल्ली : जॉन्सन अँड जॉन्सनची लस भारतात उत्पादित करण्यास अमेरिका उत्सुक असून, त्यासाठी काही खासगी कंपन्यांसोबत चर्चाही सुरू आहे, असे दिल्लीतील अमेरिकी दूतावासाचे प्रमुख डॅनियल बी. स्मिथ यांनी सांगितले. पुण्यातील लस उत्पादक कंपनी सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला (एसआयआय) उत्पादनवाढीकरिता साह्य करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही स्मिथ यांनी सांगितले.

माध्यम प्रतिनिधींशी बोलताना स्मिथ यांनी सांगितले की, भारतातील कोविड स्थितीची अमेरिकेला चिंता वाटते. चिंता वाटण्यामागे केवळ मानवता हे कारण नाही. ही आपत्ती जागतिक असल्यामुळे आम्हाला चिंता वाटत आहे. स्मिथ यांनी सांगितले की, जॉन्सन अँड जॉन्सनची लस भारतात उत्पादित करण्यासाठी कशाप्रकारे गुंतवणूक केली जाऊ शकते, यावर आम्ही काम करीत आहोत. काही खासगी उत्पादकांशी कंपन्यांच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. सरकारची जबाबदारी म्हणून परवाने व इतर बाबींची पूर्तता आम्ही निर्धाराने करू. भांडवलाची गरज असेल, तर त्यातही काही मदत करता येऊ शकते का, हेसुद्धा आम्ही पाहू. स्मिथ यांनी सांगितले की, लसीचे जास्तीत जास्त उत्पादन व्हावे यासाठी आम्ही विविध उत्पादकांच्या संपर्कात आहोत. 

मला असे कळाले आहे की, भुतानसारख्या देशांना भारताने लस पुरवठा केला आहे. ही खरोखर चांगली बाब आहे, पण आता दुसरा डोस मिळविण्यात त्यांना अडचणी येत आहेत. या देशांशी भागीदारी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 

कच्चा माल पुरविणार 
स्मिथ यांनी सांगितले की, एसआयआयच्या लस उत्पादनाकडे आमचे लक्ष आहे. एसआयआयला जास्तीत जास्त कच्चा माल पुरविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. तेथील उत्पादन वाढविण्यासाठी सर्व प्रकारची मदत देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
 

Web Title: US eager to produce vaccines in India, ready to invest for Johnson & Johnson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.