US ELECTION - अमेरिकेत मतदानाला सुरुवात

By admin | Published: November 8, 2016 06:37 PM2016-11-08T18:37:15+5:302016-11-08T19:04:07+5:30

जगातील शक्तीशाली नेत्याची निवड करणा-या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे.

US ELECTION - The beginning of the voting in the United States | US ELECTION - अमेरिकेत मतदानाला सुरुवात

US ELECTION - अमेरिकेत मतदानाला सुरुवात

Next

 ऑनलाइन लोकमत 

वॉशिंग्टन, दि. ८ - जगातील शक्तीशाली नेत्याची निवड करणा-या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. जागतिक राजकारणाची दिशा निश्चित करणा-या या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. 
 
शेवटच्या टप्प्यात शर्यतीत परतलेले रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे ही निवडणूक अधिक रंगतदार झाली आहे. महिलांना दुय्यम स्थान देण्याची मानसिकता आणि सततच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर पडले होते. 
 
आणखी वाचा 
 
 
पण हिलरी क्लिंटन यांच्या सहकारी हुमा अबेदिनचे पती अँथनी वेनरचे टि्वटर प्रकरण  आणि खासगी मेल्समुळे हिलरी अडचणीत आल्या. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात ट्रम्प आणि हिलरीमधील आघाडीचे अंतर कमी झाले. क्लिंटन यांच्याकडे निसटती आघाडी आहे पण कोणीही खात्रीलायकपणे ट्रम्प यांच्या विजयाची शक्यता फेटाळलेली नाही. त्यामुळे अमेरिकेला पहिली महिला राष्ट्राध्यक्ष मिळणार कि, प्रशासनाचा कुठलाही पूर्वानुभव नसलेले ट्रम्प बाजी मारणार हे पुढच्या काही तासाच स्पष्ट होईल. 

Web Title: US ELECTION - The beginning of the voting in the United States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.