US ELECTION - न्यू हॅम्पशायरमध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2016 04:31 PM2016-11-08T16:31:38+5:302016-11-08T18:14:39+5:30
न्यू हॅम्पशायरच्या तीन छोटया शहरांमध्ये पारंपारिक मिडनाईट मतदानाने अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ८ - न्यू हॅम्पशायरच्या तीन छोटया शहरांमध्ये पारंपारिक मिडनाईट मतदानाने अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. यूएसए टुडेच्या वृत्तानुसार रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या अटीतटीचा सामना आहे.
प्रारंभीच्या मतदानाच्या फेरीमध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत. डिक्सविले नॉच, हार्टस लोकेशन आणि मिल्स फिल्ड या तीन शहरातील मतदानाच्या निकालानुसार ट्रम्प ३२-२५ ने आघाडीवर आहेत. या तीन्ही शहरात १०० पेक्षा कमी मतदार आहेत.
आणखी वाचा
डिक्सविले नॉचमध्ये हिलरीने ट्रम्प यांच्यावर ४-२ ने विजय मिळवला. हार्टस लोकेशनमध्ये हिलरीला १७ तर, ट्रम्पना १४ मते मिळाली. मिल्सफिल्डमध्ये मात्र ट्रम्प यांनी एकतर्फी विजय मिळवला. तिथे ट्रम्पना १६ तर हिलरींना अवघी ४ मते मिळाली. कॅनडाच्या सीमेजवळ असलेल्या न्यू हॅम्पेशायरमध्ये १०० पेक्षा कमी मतदार आहेत. तिथे निवडणुकीच्या दिवशी मध्यरात्री मतदानाला सुरुवात होते. अवघे आठ मतदार असलेल्या डिक्सविले नॉचमध्ये अमेरिकन निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर होतो.