US ELECTION: कॅलिफोर्नियामध्ये मतदान केंद्रावर फायरिंग, एकाचा मृत्यू

By admin | Published: November 9, 2016 06:37 AM2016-11-09T06:37:09+5:302016-11-09T07:13:49+5:30

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडीसाठी मतदान होत असताना कॅलिफोर्नियामध्ये मतदान केंद्रावर गोळीबारी झाल्याची माहिती मिळाली आहे

US ELECTION: Firing at a polling station in California, the death of one | US ELECTION: कॅलिफोर्नियामध्ये मतदान केंद्रावर फायरिंग, एकाचा मृत्यू

US ELECTION: कॅलिफोर्नियामध्ये मतदान केंद्रावर फायरिंग, एकाचा मृत्यू

Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 9 - अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडीसाठी मतदान होत असताना कॅलिफोर्नियामध्ये मतदान केंद्रावर गोळीबारी झाल्याची माहिती मिळाली आहे. अझुला येथे मतदान केंद्रावर गोळीबार झाला आहे. गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून तीन लोक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अझुला मतदान केंद्र बंद करण्यात आलं असून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 
 
 
अमेरिकी जनता आपला 45वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी मतदान करत आहे. देशातील 50 राज्ये आणि वॉशिंग्टन डी सीमध्ये वेगवेगळ्या वेळांनुसार मतदान होत आहे. 13 राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेळेनुसार मतदान होत आहे. मात्र अनेक राज्यांमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 ते 7 दरम्यान मतदान केंद्र सुरु करण्यात आले. मतदान केंद्र सकाळी 7 ते 8 दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहेत. मतदारांच्या संख्येवर मतदान केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय अवलंबून असेल. 
 
अमेरिकेतील सर्व राज्य आणि राजधानीचा डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया धरून एकूण 538 इलेक्टर्स आहेत. त्यापैकी 270 जणांचा पाठिंबा मिळवणारा उमेदवार राष्ट्राध्यक्षपदी निवडला जाईल.
 

Web Title: US ELECTION: Firing at a polling station in California, the death of one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.