US ELECTION - हिलरी की ट्रम्प?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2016 04:33 AM2016-11-09T04:33:19+5:302016-11-09T05:48:03+5:30

महासत्तेची सूत्रे महिलेच्या हाती जाऊन इतिहास घडणार की, राजकारणातील नवख्या व्यक्तीचे पारडे जड ठरणार याचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून

US ELECTION - Hillary's Trump? | US ELECTION - हिलरी की ट्रम्प?

US ELECTION - हिलरी की ट्रम्प?

Next

वॉशिंग्टन/न्यू यॉर्क : महासत्तेची सूत्रे महिलेच्या हाती जाऊन इतिहास घडणार की, राजकारणातील नवख्या व्यक्तीचे पारडे जड ठरणार याचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून, संपूर्ण जगाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 
कोट्यवधी अमेरिकी नागरिकांनी ४५वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी मंगळवारी मतदान केले. डेमोक्रॅटिक पार्टीच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अटीतटीची लढत आहे. संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीचा पहिला निकाल पहाटे ५ वाजता हाती येईल. लोकशाहीची जननी असलेल्या अमेरिकेत प्रचाराची पातळी यंदा प्रथमच न भुतो एवढ्या खालच्या पातळीला घसरली होती. 

शेवटच्या क्षणांत हिलरी आणि ट्रम्प यांनी एकेका मतासाठी अमेरिकी जनतेसमोर जोरदार वादविवाद केला. हिलरी यांनी त्यांचे पती बिल क्लिंटन यांच्यासोबत न्यू यॉर्कच्या चाप्पाकुआ भागातील एका प्राथमिक विद्यालयात मतदान केले. मतदान केंद्रातून बाहेर पडताना त्या म्हणाल्या की, मी आनंदी आहे, अत्याधिक आनंदी आहे. त्यांनी मतदान केंद्रावरील लोकांशी हस्तांदोलन केले. या वेळी त्यांच्या समर्थकांनी ‘मॅडम प्रेसिडेंंट’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सोमवारी रात्री नॉर्थ कॅरोलिना येथे विशाल मेळाव्याला की, मी आनंदी आहे, अत्याधिक आनंदी आहे. त्यांनी मतदान केंद्रावरील लोकांशी हस्तांदोलन केले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी ‘मॅडम प्रेसिडेंंट’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

सोमवारी रात्री नॉर्थ कॅरोलिना येथे विशाल मेळाव्याला हिलरींनी संबोधित केले. या मेळाव्यात पॉप गायिका लेडी गागाने उपस्थितांच्या मनोरंजनासाठी बहारदार कार्यक्रम सादर केला. दुसरीकडे ट्रम्प यांची शेवटची प्रचार सभा मिशिगन येथे झाली. दोन्ही मेळावे रात्री एक वाजता संपले आणि अशा प्रकारे ईस्ट कोस्टमध्ये मतदान केंद्र उघडण्याच्या सहा तास आधी प्रचाराची रणधुमाळी थांबली. हिलरी यांनी डिक्सविले नोच भागात मध्यरात्रीनंतर पहिला विजय मिळवताना ट्रम्प यांच्या दोन मतांच्या तुलनेत चार मते प्राप्त केली. 

देशाचा ४५ वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी शेकडो काँग्रेस सदस्य, प्रांतिक विधानसभांचे सदस्य, स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांशिवाय जवळपास २० कोटी लोक पात्र मतदार आहेत. अमेरिकी निवडणूक प्रणालीच्या आधीच मतदान करण्याच्या तरतुदीचा वापर करीत विक्रमी ४ कोटी २० लाख लोकांनी आधीच मतदान केले आहे. २०१२ मध्ये ३.२३ कोटी लोकांनी मतदानाच्या दिवसापूर्वीच मतदान केले होते. 

 

 

 

Web Title: US ELECTION - Hillary's Trump?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.