US ELECTION - खलनायक नही नायक हूँ मै

By Admin | Published: November 9, 2016 01:31 PM2016-11-09T13:31:58+5:302016-11-09T13:33:31+5:30

खलनायकी प्रतिमा रंगवण्यात आलेले अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने जगातील अनेक देशांना धक्का बसला असेल.

US ELECTION - I'm a villain I'm a hero | US ELECTION - खलनायक नही नायक हूँ मै

US ELECTION - खलनायक नही नायक हूँ मै

googlenewsNext
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
खलनायकी प्रतिमा रंगवण्यात आलेले अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने जगातील अनेक देशांना धक्का बसला असेल. ब्रेक्झिटशी साधर्म्य साधणारा असा हा निकाल आहे. त्यावेळीही इंग्लंड युरोपियन युनियनमधून बाहेर पडणार नाही  असा बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज होता. पण प्रत्यक्षात इंग्लिश मतदारांनी ब्रेक्झिटच्या बाजूने कौल देऊन जगाला धक्का दिला. तसाच धक्का आता अमेरिकन मतदारांनी दिला. प्रसारमाध्यमांनी पक्षपाती असू नये पण या निवडणुकीत अमेरिकन मिडिया पक्षपातीपणे वागला. डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांची तळी उचलून धरताना अमेरिकेतील खरी परिस्थिती जगापर्यंत पोहचू दिली नाही. पण राष्ट्राध्यक्षाच्या निवडीने मात्र अमेरिकन जनतेच्या मनातील खरे चित्र स्पष्ट झाले आहे.
 
काय आहेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचे परिणाम 
 
- मुस्लिमांना अमेरिकेत पाय ठेऊ देणार नाही असे वक्तव्य करुन डोनाल्ड ट्रम्प सर्वप्रथम चर्चेत आले. दहशतवादा विरोधात आपली कठोर भूमिका राहील हे आधीच ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.  त्यामुळे ट्रम्प यांच्या विजयाने भारताला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या मुद्दावर एक भक्कम साथ मिळू शकते. त्यामुळे भारतातील हिंदुत्ववादी संघटनांना ट्रम्प यांचा विजय हवा आहे. 
 
- अमेरिकेला लागून असलेल्या कॅनडा आणि मेक्सिकोच्या सीमेमधून मोठया प्रमाणावर नागरीक बेकायदरित्या अमेरिकेत प्रवेश करतात. ज्याचे परिणाम अमेरिकन जनतेला भोगावे लागतात. अशा स्थलांतरीतांविरोधात आपली भूमिका कठोर राहील असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. 
 
- अमेरिकेत रोजगाराचा प्रश्न मोठा आहे. अमेरिकेतील सत्ताधारी जागतिकीकरणाचा पुरस्कार करत असले तरी तिथल्या जनतेला नोक-यांमध्ये सुरक्षिततेची हमी हवी आहे. अमेरिकेतील  बेरोजगारांची संख्या मोठी आहे. भारत-चीनचे नागरीक आपल्या नोक-या पळवतात अशी तिथल्या लोकांची धारणा बनली आहे. ट्रम्प यांनी हाच लोकांना भिडणारा मुद्या प्रचारात उचलून धरला. 
 
- बेताल वक्त्यांमुळे ट्रम्प यांची सुरुवातीपासून वादग्रस्त नेते अशी प्रतिमा बनत गेली. त्यात त्यांच्या स्त्रीलंपटपणाच्या कहाण्या पुढे आणून विरोधक आणि अमेरिकन मिडियाने त्यांना बदनाम करण्याची एकसही संधी सोडली नाही. पण हेच ट्रम्प यशस्वी उद्योजक आहेत हे नाकारता येणार नाही. भले ते बेताल बडबड करत असले तरी त्यांनी स्वत:च्या हिमतीवर उभारलेल्या उद्योगसाम्राज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. द ट्रम्प ऑर्गनायझेशनचे ते आज चेअरमन आहेत. 

Web Title: US ELECTION - I'm a villain I'm a hero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.