US Election 2020 Results Live: 'लकी' फ्लोरिडात ट्रम्प विजयी; दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष होणार?
By कुणाल गवाणकर | Published: November 4, 2020 10:21 AM2020-11-04T10:21:47+5:302020-11-04T15:59:38+5:30
US Election 2020 Results Live Updates: अमेरिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष
संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या अमेरिका निवडणुकीचा (US Election 2020 Results) निकाल थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. सध्या मतमोजणी सुरू असून सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. सध्याच्या घडीला डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन (Joe Biden) आघाडीवर आहेत. तर विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पिछाडीवर पडले आहेत. अध्यक्षपदासाठी २७० इलेक्टोरल मतं मिळणं गरजेचं आहे.
Live Updates-
- फ्लोरिडामध्ये ट्रम्प विजयी; अमेरिकन निवडणुकीत फ्लोरिडाचं महत्त्व अनन्यसाधारण
- आम्ही निवडणूक जिंकलो आहोत. पण पेन्सिल्वेनियात रात्रभर मतमोजणी कशासाठी सुरू आहे? मतमोजणीच घोटाळा झाला असून आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार- डोनाल्ड ट्रम्प
- मोठ्या राज्यांनी चित्र पालटलं; टेक्सास, फ्लोरिडा, ओहायोत ट्रम्प विजयी; मिशिगन, पेन्सिल्वेनियात ट्रम्प आघाडीवर
- टेक्सासमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय; टेक्सास जिंकल्यानं ट्रम्प यांच्या पारड्यात ३८ इलेक्टोरल मतांची भर
- फ्लोरिडामध्ये ट्रम्प यांचा विजय; ट्रम्प यांच्या खात्यात २९ इलेक्टोरल मतांची भर; पण बायडन अद्याप आघाडीवर
- चुरस वाढली; बायडन यांना २२७, तर ट्रम्प यांना २१० इलेक्टोरल मतं
- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा व्योमिंग, कन्सास, मिसुरी, मिसिसिपीमध्ये विजयी
#USElections2020 US President #DonaldTrump wins Wyoming, Kansas, Missouri, Mississippi: Reuters
— ANI (@ANI) November 4, 2020
- डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांचा वॉशिंग्टन, ओरिओन, कॅलिफॉर्निया आणि इलोनॉयसमध्ये विजय; ऍरिझोनामध्ये बिडेन यांची आघाडी
#JoeBiden wins Washington, Oregon, California and Illinois: Reuters https://t.co/eOV0EzWJh4
— ANI (@ANI) November 4, 2020
- इलेक्टोरल व्होटशी संबंधित अपडेट-
बायडन यांना २२७, ट्रम्प यांना २०४ मतं
- इलेक्टोरल व्होटशी संबंधित अपडेट-
ज्यो बायडन- १३१
मतांची टक्केवारी- ४८ टक्के
डोनाल्ड ट्रम्प- १०८
मतांची टक्केवारी- ५०.४ टक्के